औरंगाबाद : वैजापूर येथे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागात कार्यरत असलेल्या शिक्षकाने दारू पिऊन धिंगाणा घातला. झिंगलेल्या अवस्थेत शिक्षकाची एकासोबत फ्रीस्टाईल हाणामारीही झाली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास जांबरगाव येथे घडली. सदरील शिक्षक हा उचापतीखोर असून तो नेहमीच वादग्रस्त ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील रहिवासी व तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागात कार्यरत असलेला ‘तो’ शिक्षक काही मित्रांसह 12 फेब्रुवारी रोजी गावाजवळच असलेल्या हॉटेलमध्ये रात्रीच्या सुमारास ‘बसला’ होता. त्याचवेळी त्याच्याच गावातील तरूण तेथे जाऊन बाजूला असलेल्या टेबलवर बसला. तो बसल्यानंतर शिक्षकाने त्या तरुणाला तुझी माझ्या बाजूला बसण्याची औकात आहे का ? तुला माहित आहे का? मी कोण आहे? असे म्हणत शिव्या दिल्या. यावर त्या तरुणाची आणि शिक्षकाची बाचाबाची झाली. आसपासच्या काही ग्राहकांनी भांडण सोडविण्यासाठी गेल्यामुळे हे प्रकरण तेथेच मिटले. परंतु दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा जांबरगावमध्ये दोघांची पुन्हा समोरासमोर गाठ पडली. यावेळी मात्र त्यांची चांगलीच फ्रीस्टाईल हाणामारी झाली.
तुंबळ हाणामारी झाल्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावले. या प्रकरणी परस्परविरोधी दिलेल्या तक्ररीवरून दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, येथील तहसील कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असून कुणाचे कुणावर नियंत्रण राहिले नाही. कार्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढत चालली असून वरिष्ठ अधिकारी त्यांना लगाम घालायला तयार नाहीत. हे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या तोऱ्यात वावरत असतात. परिणामी सामान्य नागरिक त्यांच्या मुजोरीमुळे हवालदिल झाले आहेत. या शिक्षकाने दारू पिऊन राडेबाजी केली. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी त्याची गच्छंती करतात का? पुन्हा त्याला अभय देतात? हा प्रश्न मात्र सध्या अनुत्तरीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तर वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान
- ‘वो नही करेंगे तो हम करके दिखायेंगे’, सरदार वल्लभभाईंच्या पुतळ्यावरून काँग्रेसचा शिवसेनेला इशारा
- ‘पूजा चव्हाण यांच्या वडिलांचे स्टेटमेंट अतिशय दुर्दैवी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

