🕒 1 min read
हरारे : पाकिस्तान आणि झिम्बाब्वे संघादरम्यान कसोटी मालिका सुरु आहे. दोन सामन्याच्या या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना हरारे येथे सुरु आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी पाकिस्तानने झिम्बाब्वेला फॉलोऑन दिला आहे. झिम्बाब्वे संघाच्या फलंदाजीदरम्यान पाकिस्तान आणि झिम्बाब्वे संघाच्या खेळाडुमध्ये बाचाबाची झाली आहे.
झिम्बाब्वेच्या दुसऱ्या डावात पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली डावातील ४९ वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकातील तिसरा फलंदाज चेंडू ल्यूक जॉन्ग्वेच्या पायाला लागल्यानंतर जॉन्ग्वे काहीच बोलला नाही. मात्र बळी न मिळाल्याने गोलंदाज हसनने चिडुन त्याला उसकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकारानंतर जॉन्ग्वेही थोडा आक्रमक झाला. त्याने पुढील चेंडूवर खणखणीत चौकार मारत हसनला प्रत्युत्तर दिले. पुढे तो स्वतच स्वतशी काहीतरी पुटपुटला. यावेळी चिडलेल्या हसन त्याच्याशी वाद घालण्यासाठी रागारागाने जॉन्ग्वेच्या जवळ गेला आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर हसनने टाकलेला पुढील चेंडू जॉन्ग्वेने मुद्दाम मागे हटत खेळला नाही आणि तो हसनकडे पाहात गालातल्या गालात हसू लागला.
In case you missed it.
Dear Hassan, if you dish it out, you must be able to take it also! The walk away sealed the W #ZIMvPAKCredit: Rabbitholebd Sports pic.twitter.com/meBMuHkXMW
— Mamzi (@GodwillMamhiyo) May 9, 2021
पाकिस्तान संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५१० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात यजमान झिम्बाब्वे संघ १३२ धावांवरच सर्वबाद झाल्यामुळे फॉलोऑनसाठी झिम्बाब्वे संघ मैदानावर उतरला आहे. या डावात झिम्बाब्वेने २२० धावात ९ गडी गमावले आहे. तर १५८ धावांनी झिम्बाब्वे संघ अजुनही पिछाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘केंद्राने महाराष्ट्राला पाठवलेली आरोग्य सामुग्री कुठे गेली? याचा लेखाजोखा प्रथम जयंत पाटलांनी जनतेला द्यावा’
- घाटीत कोरोनाग्रस्त बालकांना खेळण्यासाठी खोली मात्र, पालकांनो ही वेळच यायला नको!
- भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका कोण जिंकणार? द्रविडने केली भविष्यवाणी
- वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा ‘बनाना स्विंग’; व्हिडीओ व्हायरल
- ‘विरोधकांचे रक्त सांडण्यात मग्न असल्यामुळे ममतांच्या लक्षात ‘ही’ गोष्ट आली नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
