🕒 1 min read
मुंबई : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा आयपीएल स्पर्धतुन दुखापतीमुळे खेळु शकला नाही. मात्र आता दुखापतीमधून सावरल्यानंतर जोफ्राने जोरदार पुनरागमन केले आहे. इंग्लंडमध्ये सुरु असेलेल्या सेंकड इलेव्हन चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत त्याने पुनरागमन केले आहे.
या स्पर्धेत ससेक्स आणि सरे यांच्यादरम्यान एका सामन्यातील जोफ्रा आर्चरने टाकलेला एक चेंडु सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. ससेक्सकडून खेळताना आर्चरने सरेचा मधल्या फळीतील फलंदाज रिफरला असा काही चेंडु टाकला. जो पाहुन फलंदाज आश्चर्यचकित झाला. आर्चरचा चेंडु इतका भयंकर स्विग झाला, त्यामुळे या स्विंगला ‘बनाना स्विंग’ हे नाव पडले. या चेंडुवर रिफर पायचित झाला. हा व्हिडिओ ससेक्स क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Not a bad delivery! ????
Two wickets for @JofraArcher against Surrey's second XI yesterday, including this one… ☄️ pic.twitter.com/vBc5s09l4B
— (C) Sussex Cricket ???? (@SussexCCC) May 7, 2021
या सामन्यात आर्चरने फलंदाजीतही चमक दाखवताना तुफान फटकेबाजी केली. आर्चरने या सामन्यात ४६ चेंडुत ३ चौकार आणि २ षटकारासह ३५ धावांची खेळी केली. मात्र या सामन्यातील दुसऱ्या डावात आर्चर गोलंदाजीसाठी आलाच नाही. कारण त्याची फिटनेस अजुनही संघासाठी चिंतेची बाब आहे. भारताच्या दौऱ्यात कसोटी आणि टी-२० मालिकेनंतर दुखापतीमुळे त्याने एकदिवसीय मालिकेतुन माघार घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्रातील गरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे आणि कोणी विकला त्याचा खुलासा पाटलांनी करावा’
- दिलासादायक बातमी : देशातील नवीन रुग्णांची संख्या पाच दिवसात पहिल्यांदाच झाली कमी
- इरफान पठानवर आरोप करणाऱ्या वृद्ध दांपत्याची माघार, व्हिडीओ पोस्ट करत मागीतली माफी
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- आयपीएलनंतर टी -20 वर्ल्ड कप देखील होणार स्थगित ? चॅपेल यांनी केले मोठे विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
