Share

रस्ते दुरुस्ती, तीर्थक्षेत्रासाठी जिल्हा परिषदेची 28 कोटी 51 लाखांची तरतूद

Published On: 

औरंगाबाद : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आणि तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा परिषदेने 28 कोटी 51 लाखांची तरतूद केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती आता होणार आहे. जिल्हा परिषद बांधकाम समितीची बैठक सभापती किशोर बलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये ३०:५४ व ५०:५४ या शीर्षाअंतर्गत १६ कोटी ७८ लाख व ८ कोटी ५५ लाखांची तसेच तीर्थक्षेत्र विकासासाठी ३ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद करण्याचे निश्चित करण्यात आले.

ग्रामीण भागामधील अनेक रस्ते खराब आहेत. त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी रस्ते दुरुस्तीचे प्रस्तावही दिलेले आहेत. २४:२५ अंतर्गत १६ कोटी ७.८ लाख, ५०:२४ अंतर्गत ८ कोटी ५५ लाख आणि ‘क’दर्जाच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी ३ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद आहे.

बांधकाम समितीच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम वाटप होणार आहे. याचे नियोजन करण्यात येत आहे. बांधकाम विभागाकडे असलेलया निधीतून ग्रामीण भागातील कामे होतील, असे सभापती गलांडे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!