पुणे – धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, पालघर आणि नागपूर या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. यात बहुतांश सर्वच पक्षांना आपापले गड राखण्यात यश मिळाल्याचं चित्र आहे.
पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 15 जागा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 4, तर शिवसेनेला 5 जागांवर यश मिळालं. कम्युनिस्ट पक्षाला 1 जागा मिळाली असून एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला.काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीला या निवडणुकांमध्ये खातेही उघडता आले नाही.पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला डहाणू तालुक्यातल्या जागेवर भाजपचे उमेदवार पंकज कोरे यांच्याकडून पराभवाचा पत्करावा लागला.पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली असून त्यांचे पाच उमेदवार निवडून आले आहेत.राष्ट्रवादीला दोन, भाजपला तीन आणि बहुजन विकास आघाडीला 3 तर मनसेला एक जागा मिळवण्यात यश मिळाले आहे.
धुळ्यात सत्ताधारी भाजपने 15 जागांपैकी 8 गटांमध्ये बाजी मारत जिल्हा परिषदेवरील आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेच्या 7 गटात यश मिळवलं; त्यात काँग्रेसला 2,राष्ट्रवादी काँग्रेसला 3 आणि शिवसेनेला 2 जागांवर विजय मिळाला. पंचायत समितीच्या 30 गणांपैकी 15 जागांवर भाजपाला तर 11 जागांवर महाविकास आघाडी च्या घटक पक्षांना यश मिळालं. 4 जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले.
नंदुरबारमध्ये तीन पंचायत समितीच्या चौदा गणांमधल्या निवडणुकीत भाजपला 4 जागांवर समाधान मानावं लागलं. तर शिवसेनेला 5,राष्ट्रवादीला 1 आणि कॉंग्रेसला 4 जागा मिळाल्या.नंदुरबार मध्ये जिल्हा परिषदेच्या 11 गटांपैकी कॉंग्रेसला 3, राष्ट्रवादीला 1 तर शिवसेनेला 2 जागा मिळाल्या.भाजपाला 4 जागांवर विजय मिळवता आला. आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी यांची बहिण गीता पाडवी विजयी झाल्या तर कोळदे गटातून भाजप खासदार डॉ. हिना गावित यांच्या भगिनी विजयी झाल्या, कोपर्ली गटातुन शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांचे चिरंजीव राम रघुवंशी दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.
वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 पैकी 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या आहेत. काँग्रेस 4,भाजपला 2 तर शिवसेना, जनविकास,वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारानं प्रत्येकी 1 जागा मिळवली आहे.6 पंचायत समित्यांच्या 27 गणांच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं 10 तर काँग्रेस आणि शिवसेनेनं प्रत्येकी 5 जागांवर विजय मिळवला.वंचित बहुजन आघाडीनं 3, तर भाजपानं 2 जागा जिंकल्या आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवारानं बाजी मारली आहे.
अकोला जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीचं वर्चस्व कायम राहिलं आहे.वंचित बहुजन आघाडीचे 6, अपक्ष 2, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1, भाजप एक, शिवसेना एक आणि प्रहार संघटनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे. जिल्ह्यातील अकोला, बाळापूर,अकोट आणि तेल्हारा या पंचायत समित्यांवरही वंचित बहुजन आघाडीने सत्ता कायम ठेवली आहे.
नागपूर जिल्ह्यातील पंचायत समितीच्या 31गणापैंकी काँग्रेसने 21, भाजप 6,राष्ट्रवादी काँग्रेस 2,तर बहुजन समाज पक्ष आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाने प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे.नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 16 जागांपैकी 9 जागा जिंकत सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाने नागपूर ग्रामीणमध्ये आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. भाजपने 3,राष्ट्रवादी कॉंग्रेसने 2,शेतकरी कामगार पक्ष आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाने प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा व ओबीसींबाबत दुटप्पीपणामुळे भाजपला फटका; पोटनिवडणुकीबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
- धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी झाली खुली; ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- औरंगाबादेत पुन्हा बरसला जोरदार पाऊस, झाडे कोसळून वाहने चकनाचूर!
- निवृत्त न्यायाधीश करणार लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास; दोन महिन्यांची डेडलाईन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

