Share

यम है हम! जालनावासियांना घरी बसवण्यासाठी यमराज आले रस्त्यावर

Published On: 

जालना – जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे, रुग्णांची ही संख्या सध्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन आणि जो तो कोरोनाच्या उपाययोजना करण्यासंदर्भात आपापल्यापरीने जनजागृती करत आहेत. मात्र तरीदेखील नागरिकांमध्ये पाहिजे तेवढी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे आता स्वतः यमराज रस्त्यावर उतरून कोरोनापासुन बचाव करण्याच्या उपाययोजनेची जनजागृती करत आहे.

जालना शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन पुढील तीन दिवसांमध्ये कोरोनापासून बचाव करण्याची जनजागृती केली जाणार आहे. आतापर्यंत सरकारी यंत्रणा, स्वायत्त संस्था, विविध सेवाभावी संस्था यांच्यावतीने कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली आहे. परंतु नागरिकांनी अजून त्याचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. कोरोनाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी स्वतः यमराज रस्त्यावर फिरत आहे. गल्लीबोळातून हा यमराज फिरणार आहे आणि मास्कविषयी जनजागृती करणार आहे.

फक्त जनजागृतीच नव्हे तर ज्याच्या तोंडाला मास्क नाही त्याला मोफत मास्क देखील स्वतः यमराज देणार आहे. यापुढे जाऊन नागरिकांनी मास्कचा वापर केला नाही तर यमराजापासून त्याला कोणीही वाचवणार नाही, असा संदेश या माध्यमातून देण्याचा या जयंती उत्सव समितीचा प्रयत्न आहे. या यमराजासोबतच कोरोनापासून बचाव करण्याचे उपाययोजना सांगणारी ऑडिओ क्लिप देखील फिरत आहे.नवीन जालना भागातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोहिमेची सुरुवात झाली.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!