Share

जालना महापालिकेचा प्रस्ताव सभेत आल्यास फेटाळून लावणार : अशोक पांगारकर

Published On: 

जालना : जालना नगर पालिकेचे रुपांतर महापालिकेत होण्यास आपला विरोध आहे, तशाप्रकारचा प्रस्ताव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आलाच तर तो फेटाळून लावण्यात येईल, अशी माहिती भाजपचे गटनेते अशोक पांगारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. आर्थिक बाबींचा कोणताही विचार न करता जालना नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर करण्याचा घाट काही मंडळींनी घातला असल्याचा आरोप पांगारकर यांनी केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात पांगारकर यांनी म्हटले की, जालना नगरपालिका ही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची अ वर्ग असलेली नगर परिषद आहे. सद्य:स्थितीत जालना नगरपालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य शासनाच्या सहायक अनुदानातून अदा करण्यात येते. नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत केल्यास या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन महापालिकेला स्वतः करावे लागणार आहे. इतका पैसा कसा उपलब्ध होईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून दिला जाणारा निधी देखील पालिका अस्तित्वात आल्यानंतर बंद होईल. महत्त्वाचे म्हणजे परभणी, लातूर आणि अकोला या महापालिका अस्तित्वात येऊन आता 10 वर्षांचा कालावधी उलटला असून या काळात तिन्ही शहरातील विकासाची काय अवस्था आहे. जालना नगरपालिका ही नगरपालिकाच राहिली पाहिजे असे आपले वैयक्तिक मत, असल्याचे पांगारकर यांनी म्हटले आहे. नगरपालिका सुविधा उपलब्ध करून देण्यात सक्षम असताना महापालिकेत रूपांतर करण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे, असा सवाल अशोक पांगारकर यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!