पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे परिचित आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना ते खडेबोल वेळोवेळी चांगलंच खडासवलं आहे. कामाच्या बाबतीत ते कोणाचंही खैर करत नाही. मग तो पक्षाचा पदाधिकारी असो वा एखादा अधिकारी याची प्रचिती रविवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी अनुभवली. बारामती तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी जाहीर सभेत डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याला धारेवर धरले.
हे निवेदन दाखवत अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भरसभेत धारेवर धरले. ते म्हणाले, ‘DYSP इथे दारूबंदी व्हावी म्हणून मला निवेदन आले आहे. 2007 मध्ये दारूबंदी झाली होती. परंतु ती पुन्हा सुरू झाली. याचा त्रास येथील गोरगरीब महिलांना होत आहे. नेमकी अडचण काय आहे ? कायमची दारू बंदी करून टाका. जे कोणी असतील त्यांना टाडा लावा, काय लावायचे ते लावा पण कायमची दारूबंदी करून टाका. मी तुम्हाला चांगले DYSP म्हणून बारामतीत आणले होते. बारामतीच्या कुठल्याही भागात चालणारे दोन नंबरचे धंदे, बेकायदेशीर दारूविक्री, हातभट्टी कायमची बंद करा, जी कारवाई करायची असेल ती करा, असे सांगत अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत.
बारामती तालुक्यातील एका गावात सुरू असणाऱ्या अवैध दारू विक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलेने अजित पवार यांना निवेदन देऊन आपली व्यथा सांगितली. माझा नवरा दारू पिऊन येतो, घरात लक्ष देत नाही, घराला घरपण राहिले नाही. त्यामुळे अवैध दारू विक्री बंद व्हावी, अशा स्वरूपाचे निवेदन या महिलेने अजित पवारांना दिले होते. यावरुन अजित पवारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. मात्र यावेळी बोलताना अजित पवारांच्या या स्पष्टवक्तेपणाची संपूर्ण ग्रामीण पोलीस दलात चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदींच्या विरोधात सक्षम चेहरा नाही असं म्हणता येणार नाही- शरद पवार
- या भेटीच्या निमित्ताने इतिहासाच्या जवळ जाता आलं; केदार शिंदे भावूक
- क्रिप्टोकरन्सीबाबत घेणार मोठा निर्णय; पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक
- ‘कंगनाने केलेलं वक्तव्य जर एखाद्या मुस्लिमाने केले असते तर…’, ओवैसींचा हल्लाबोल
- अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही- शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

