मुंबई : मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातवरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत आज प्रदर्शित करण्यात आली असून उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी लव्ह जिहादचा विषय देखील या मुलाखतीमध्ये काढला.
यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, ‘लव्ह जिहादचं राजकारण हा भाग वेगळा.. पण लव्ह जिहाद म्हणजे काय? मुस्लिम युवकाने हिंदू युवतीशी लग्न करायचं याला त्यांचा विरोध आहे. मग तुमची मेहबुबा मुफ्तीसोबत युती कशी चालली? नितीशकुमारांबरोबर कशी चालली? चंद्राबाबूंसोबत कशी चालली? ज्या ज्या युत्या तुम्ही केल्या… त्यात भिन्न विचारांचे पक्ष तुम्ही एकत्र येऊन युती चालते हे लव्ह जिहाद नाही? आहेच ना?’ असं म्हणत त्यांनी भाजपच्या लव्ह जिहाद विरुद्धच्या कायद्याबाबतच्या भूमिकेवरून टोला लगावला आहे.
लव्ह जिहाद कायद्यावर मुख्यमंत्री म्हणाले; ‘आम्ही येस सर करून कायदा करू’
महाराष्ट्रात लव्ह जिहाद आहे का? असं विचारण्यात आलं तेव्हा, लव जिहाद विरुद्ध कायदा करा अशी भाजपची मागणी आहे. कारण उत्तर प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश आम्ही ‘येस सर’ करून कायदा करू, पण तो करताना मी अनेकदा बोललो आहे, आजही परत सांगतो. तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा करा अगदी कश्मीर ते कन्याकुमारी आता कश्मीरचं सगळं बंधन उठवलंय ना तुम्ही गोव्यात करा गोवंश हत्याबंदी, तुमचं (भाजपचं ) सरकार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची भाजपची हिंमत नव्हती’
- ‘शरद पवार हे सरकारचे मार्दर्शक आहेत, रिमोट कंट्रोल नाहीत’
- #व्यक्तिविशेष : २०११ विश्वचषकाचा शिलेदार सुरेश रैना उर्फ ‘चिन्ना थाला’चा आज जन्मदिवस!
- ‘तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू’ ईडीच्या कारवाईनंतर ठाकरेंचा थेट इशारा
- पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावर उद्धव ठाकरें म्हणाले, ‘चांगल्या कामाला आमच्या नेहमीच शुभेच्छा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
