टीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर इथल्या नाथपंथीय योगी गोरखनाथ पीठाचे विद्यमान महंत आहेत.या गोरखनाथ पीठात चैत्र नवरात्री उत्सव हा खूपचं महत्त्वाचा मानला जाणारा उत्सव आहे.या नऊ दिवसात पहिल्या दिवसापासून मंदिरात अनुष्ठान आणि सगळेच धार्मिक कार्यक्रम सुरू झालेले असतात.या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान पीठाधीश्र्वर आणि त्यांचे उत्तराधिकारी मठातून बाहेर येत नाहीत.मठाच्या इमारतीच्या परिसरातच त्यांचे वास्तव्य असते.नवव्या दिवशी कन्या पूजन हा विधी होतो.त्यानंतर महंतांना आणि पीठाधिश्र्वरांना बाहेर जायला परवानगी मिळते.
योगी आदित्यनाथ हे गेल्या अनेक वर्षांपासून या परंपरेचं अगदी तत्परतेने पालन करत आहेत.पण या वर्षी मात्र त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाला फाटा दिला.कारण उत्तर प्रदेशातील दिवसेंदिवस वाढत जाणारी ‘ कारोणा ‘. रुग्णांची संख्या.त्यामुळे प्रशासनाला सतत अनेक आघाड्यांवर काम करावे लागते आहे.परिणामी गोरखनाथ पीठाचे महंत योगी आदित्यनाथ यांना सतत प्रदेशातील लोकांच्या सुरक्षेसाठी तत्पर राहावे लागतं आहे.
२०१४ साली योगी आदित्यनाथ यांना अशाच एका प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते
३० सप्टेंबर २०१४ रोजी गोरखपूर इथे नंदानगर रेल्वे क्रॉसिंग या ठिकाणी लखनऊ – बरोनी आणि मडूआडिय – लखनऊ या दोन एक्स्प्रेस ची टक्कर होऊन प्रचंड मोठा हादसा झाला होता.त्या ठिकाणावरून रेल्वे स्टेशन जवळपास ५ -६ किमी लांब होते.या दोन्ही रेल्वेमध्ये बरेच प्रवासी होते.आणि त्यात महिला व लहान बालकांची संख्या लक्षणीय होती.परिणामी त्याठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता.त्यावेळी सुद्धा गोरखपूर मठात असाच मोठा उत्सव चालू होता.पण ही बातमी गोरखपूरचे तत्कालीन खासदार असणारे छोटे महाराज म्हणजेच योगी आदित्यनाथ यांच्या कानावर गेली.मठाची परंपरा मोडत फक्त जनसेवेसाठी ते कुठलीही पर्वा न करता थेट दुर्घटना घडली त्याठिकाणी पोहोचले आणि रात्री उशिरा पर्यंत सगळी परिस्थितीत व्यवस्थित होईस्तोवर तिथे थांबले आणि सगळ्याच प्रवाशांना सुखरूप पाहिजे त्याठिकाणी पोहचवले.असा कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री उत्तर प्रदेशातील जनेतेला लाभला म्हणून निश्चितच उत्तर प्रदेश लवकरच कोरोणा मुक्त होईल असे आपण म्हणू शकतो.


