Share

निरोगी आरोग्यासाठी राज्यपालांनी दिला मंत्र, म्हणाले…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : निरोगी आरोग्यासाठी योग सर्वोत्तम आहे, भारताला योगामुळे जागतिक ओळख मिळाली आहे असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. सांताक्रुझ येथील योगा इन्स्टिट्यूटच्या 101 व्या वर्षपूर्ती व महापालिकांच्या शाळांतील योग प्रशिक्षणाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत हेाते. व्यासपीठावर योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. हंसाजी जयदेव योगेंद्र, मदन बहल, ऋषी योगेंद्र उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, योगविद्येशी भारताचे घट्ट नाते आहे. योगामुळे मानवी मन सकारात्मक विचार करते. मनाला नियंत्रित करण्याची क्षमता योगात आहे. योगामुळे अनेक व्याधीं दूर राहतात. आजच्या काळात आपल्या देशातील योग शिक्षणाची परंपरा जीवंत ठेवण्यात योगा इन्स्टिट्यूटने मोलाचे कार्य केले आहे. संस्थेने योग परंपरा शंभर वर्षांपासून जपल्याची बाब कौतुकास्पद आहे, असे सांगत राज्यपालांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ. हंसाजी योगेंद्र यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. महानगर पालिकांच्या शाळेत गेल्या 25 वर्षांपासून संस्था योग शिक्षण देत असल्याचे सांगितले. कार्यक्रमास मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 60 शाळांचे प्राचार्य उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!