Share

निकालापासून आम्ही सांगत आहोत, तरीही तुम्ही लोकं समजून घेत नाही

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ”राज्याच्या जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. हे मी निकाल लागल्यापासून सांगत आहेत. तरीही तुम्ही लोकं समजून घेत नाही. आमच्या आघाडीचा आकडा 145 आहे. आम्ही सगळे मिळून एकत्र आलो तरीही आम्ही 115 पर्यंत जातो. त्यापुढे काही जात नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ”मी तुम्हा सर्वांना निकाल लागल्यापासून सांगतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. हे मी तुम्हाला 24 तारखेपासून वारंवार सांगत आहेत. मात्र तरीही तुम्ही लोकं हे समजून घेत नाही.” शिवसेनेकडून काही प्रस्ताव आला का विचारले असता त्यांनी ” राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली. पण त्या भेटीत त्यांचे नेमकं काय बोलणं झालं याबाबत मला माहीत नाही.” असे स्पष्टीकरण दिले.

” राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आम्ही अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी काल राज्यपालांसोबतच्या चर्चेचे निवदेन दिले. राज्यपाल आमच्याशी काय बोलले याबाबतची सविस्तर माहिती आम्ही शरद पवारांना दिली, असल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे, यासाठी भाजपकडून शिवसेनेला विविध प्रस्ताव पाठविला असून शिवसेनेने प्रस्तावाला कोणतेही उत्तर दिले नाही. शिवसेना मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील ५०-५० च्या वाट्यावर अडून आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1192052286815518720?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192065561867374593?s=20

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!