मुंबई : “स्थलांतरित मजुरांबाबत सुप्रीम कोर्टाचा कालचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या दाव्यांवर चपराक असल्याचं सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारवर घणाघात केला आहे. फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली.
नेमकं काय म्हणाले फडणवीस ?
आमच्यावतीने जे मुद्दे उचलले जात होते त्यावर राज्य सरकार म्हणत होतं की, तुम्ही विरोधाला विरोध करत आहात. तुम्ही महाराष्ट्रविरोधी आहात. मग आता महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का?स्थलांतरित मजुरांची कुठेही नोंद नाही. त्यांची व्यवस्था झाली नाही. त्यांना जेवण मिळालं नाही. त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था सरकारने उभी केली नाही, असं सगळं सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आलं आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाने इतर कुठल्याही राज्यांवर ताशेरे ओढले नाहीत. फक्त महाराष्ट्रावर ताशेरे आहेत .एखादा मुद्दा विरोधी पक्षाने चांगल्याकरता मांडला तर त्याचा विचार करुन सरकारने कारवाई केली पाहिजे. दुर्देवाने तसं न झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला चपराक दिली.
“…अन्यथा कोरोनाचा विजय होईल”, अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली चिंता
दरम्यान, पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दर्शवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रस्ताव होता, त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा दिला, शिवाय पुरवणी मागण्यांसाठी जर एखादं दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकराचं नियोजन असेल, तर त्यालाही पाठिंबा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
