Share

‘हो! गेले काही दिवस आव्हानात्मक’ ; राज कुंद्रा प्रकरणावर शिल्पा शेट्टीचे भावनिक निवेदन

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यापासून शिल्पालाही प्रश्न विचारले जात आहेत. पतीला अटक झाल्यापासून शिल्पाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. त्यानंतर आज, प्रथमच तिने आपले मौन मोडत या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणाली शिल्पा शेट्टी?

‘हो! गेले काही दिवस आव्हानात्मक होते, प्रत्येक गोष्टीवर खूप अफवा आणि आरोप झाले आहेत. माध्यमांनी आणि हितचिंतकांनी (नसलेल्या) माझ्यावर बर्‍याच अनावश्यक टिपण्या केल्या. बरेच ट्रोलिंग/प्रश्न विचारले. फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही, या प्रकरणावर मी अद्याप कोणतीही कमेंट केलेली नाही. आणि या प्रकरणात असे करणे टाळत राहीन, कारण ते न्यायालयीन प्रकरण आहे, म्हणून कृपया खोटे कोट देणे थांबवा.

एक सेलिब्रिटी म्हणून ‘कधीही तक्रार करू नका, कधीही खुलासा देऊ नका’ या माझ्या तत्त्वज्ञानाची पुनरावृत्ती करेन. मी एवढेच म्हणेन की, ही चालू असलेली तपासणी न्यायालयात प्रविष्ट आहे. आणि मला मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

एक कुटुंब म्हणून, आम्ही आमच्या सर्व उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब करत आहोत. पण, तोपर्यंत मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते – विशेषत: आई म्हणून – माझ्या मुलांच्या फायद्यासाठी आमच्या प्रायव्हसीचा आदर करा आणि तुम्हाला विनंती करते की, सत्यता पडताळल्याशिवाय अर्धवट माहितीवरून वक्तव्य करण्यापासून दूर राहा.

मी एक कायद्याचे पालन करणारी भारतीय नागरिक आहे आणि गेली 29 वर्षांपासून खूप मेहनती व्यावसायिक आहे. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि मी कोणालाही निराश केलेले नाही. तर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी तुम्हाला विनंती करते की, या काळात माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या प्रायव्हसीच्या अधिकाराचा आदर करा. आम्हाला मीडिया ट्रायलची गरज नाही. कृपया कायद्याला मार्ग दाखवू द्या.

सत्यमेव जयते!

– शिल्पा शेट्टी कुंद्रा

https://www.instagram.com/p/CSEB7z0jiYZ/?utm_source=ig_web_copy_link

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!