नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दररोज देशातील करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १९ हजार १४८ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दिसरभरात ४३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी : कोरोना टेस्ट साठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही
करोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ४ हजार ६४१ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात २ लाख २६ हजार ९४७ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ८५९ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १९ हजार १४८ करोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे ११ हजार ८८१ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.
एका बाजूला जगण्यासाठी संघर्ष सुरु असताना गोव्यातही 2 जुलैपासून पर्यटन सुरु करण्यात आलं आहे. राज्य सरकारनं जारी केलेल्या एसओपीप्रमाणे चालू शकणाऱ्या 250 हॉटेल्सला पर्यटन विभागाकडून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.विदेशातील पर्यटकांना मात्र अद्याप गोव्यात येता येणार नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे
एकदा करोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा करोनाविरूद्ध लढा देणाऱ्या गोव्यानं पर्यटन खुल करण्याचं निश्चित केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी यांची घोषणा केली.
पर्यटकांसाठी अशी आहे नियमावाली
गोव्यात येण्यापूर्वी पर्यटकांना त्यांचं हॉटेलमधील राहण्याचं बुकिंग अगोदरच करावं लागणार आहे. त्यानंतर ते पर्यटन विभागाकडे परवानगीसाठी येईल. त्याचबरोबर पर्यटकांना गोव्यात दाखल होताना करोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र सोबत ठेवावं लागणार आहे. तसेच प्रमाणपत्र नसल्यास अशा पर्यटकांची चाचणी सीमेवरच चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत राज्य सरकारच्या वतीने त्यांना क्वॉरंटाईन ठेवलं जाईल.
प्रियंका वाड्रा यांना सरकारी बंगला सोडण्यासाठी सांगताच कॉंग्रेस नेत्यांनी सुरु केला थयथयाट
ज्या पर्यटकांच्या करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, त्यांना दोन पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यांना त्यांच्या मूळ राज्यात जाण्याची परवानगी दिली जाईल अथवा गोव्यातच उपचार घेण्याचा पर्यायही असणार आहे.’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

