Share

प्रियंका वाड्रा यांना सरकारी बंगला सोडण्यासाठी सांगताच कॉंग्रेस नेत्यांनी सुरु केला थयथयाट

Published On: 

नवी दिल्ली : कॉग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका वाड्रा यांना गृह निर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने मंत्रालयाने एका महिन्याच्या आत बंगला खाली करण्यास सांगितलं आहे. या नोटिसमध्ये प्रियंका गांधी यांना 1 ऑगस्ट पर्यंत लोधी इस्टेट येथील बंगला रिकामा करण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे.

अमित देशमुखांचा धडाका ; कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी घेतला मोठा निर्णय

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार यांनी पाठवलेल्या अधिकृत पत्रात, प्रियंका वाड्रा यांना आता एसपीजी सुरक्षा नसल्याने त्या राहत असलेला दिल्लीतील लोधी रोडवरील बंगला रिकामा करावा. असं म्हटलं आहे.

मागील वर्षी प्रियंका वाड्रा यांची विशेष सुरक्षा काढून त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली होती. नियमांनुसार सुरक्षा व्यवस्था पुरवताना विशेष सुरक्षा पुरवली जाईल त्याला सरकारी बंगल्याची तरतूद आहे. मात्र, झेड सुरक्षा व्यवस्थेत सरकारी निवासस्थानाची तरतूद नाही. याचाच आधार घेऊन प्रियंका गांधी यांना ही नोटीस देण्यात आली आहे.

सरकारी आदेशानुसार प्रियंका गांधी यांना 1 ऑगस्ट 2020 पूर्वी हा सरकारी बंगला सोडावा लागेल. त्यांना देण्यात आलेल्या अधिकृत नोटीसमध्ये त्यांनी निश्चित वेळेत बंगला रिकामा न केल्यास त्यांना आर्थिक दंडही होऊ शकतो.

केंद्र सरकारच्या या नोटीसनंतर काँग्रेसने यावर थयथयाट केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक ट्विट करत केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. ते म्हणाले, ‘भाजप आणि मोदी सरकारचा काँग्रेसच्या नेत्यांबद्दल आंधळा द्वेष आणि बदल्याची भावना जगजाहीर आहे. आता तर त्यांनी आणखी खालच्या स्तरावरील मार्ग निवडला आहे. प्रियंका गांधी यांना घर रिकामं करण्याच्या नोटीसवरुन मोदीजी आणि योगीजी यांची अस्वस्थता समजून घेता येऊ शकते.

खोटे खुलासे करून नागपूरकरांची दिशाभूल करु नका; महापौरांची मुंढेंवर घणाघाती टीका

दरम्यान,सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका आता उत्तर प्रदेशमध्ये शिफ्ट होतील. त्या लखनऊमधील बंगल्यात राहतील. उत्तर प्रदेश राज्यात २०२२च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रियंका आता लखनऊमध्ये राहण्याबाबत तयारी करत आहेत. त्या लखनऊमधील ‘कौल हाऊस’ मध्ये शिफ्ट होतील, अशी शक्यता आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!