मुंबई – देशात कोळसा तुटवडा निर्माण झालाय त्याला मोदी सरकारचे चुकीचे धोरण असल्याचा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. खाणीत कोळसा असताना खणीकरण होत नाही. कोळसा परदेशातून आयात होतो या सगळ्या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
देशात कोळसा मिळत नाहीय. त्यामुळे देशातील व राज्यातील बरेच वीजनिर्मितीचे संच बंद पडले आहेत. आयात कोळसा करुनही तो उपलब्ध होत नाहीय. आयातीमुळे या देशातील जे परकीय चलन आहे ते जास्त खर्च होतेय असेही नवाब मलिक म्हणाले.
युपीए सरकार असताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भविष्यात आपल्याला जास्त वीज लागणार आहे याची निर्मिती झाली पाहिजे त्याची पॉलिसी निर्माण केली. कोळशाच्या खाणी वितरीत करण्यात आल्या त्यावेळी भाजपने कोळसा घोटाळा झाला म्हणून रान उठवले होते. त्यामुळे ते रद्द करण्यात आले होते. कालांतराने त्या खाणी काही लोकांना देण्यात आल्या त्या आजपर्यंत त्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची करडी नजर?; पुराव्यासह केला आरोप
- केसरी शिधापत्रिका धारक परिवारांना तेल, साखरेसह इतर धान्य नाममात्र दराने उपलब्ध करून द्या- भातखळकर
- आरसीबी फक्त 10 खेळाडूंसह खेळत होता; परभावानंतर सेहवाची संघावर टीका
- महिना १०० कोटी वसुलीचे तरी कुठे लेखी आदेश दिले होते? गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर भाजपची टीका
- ‘हा प्रश्न मला विचारू नका’ म्हणत चालू मुलाखतीतून माईक फेकून मलिक निघून गेले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

