मुंबई : मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी करण्यात आली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे प्रचंड चर्चेत आले आहेत.
नुकताच वानखेडे यांनी पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे. वानखेडे यांच्या या आरोपांमुळे विरोधकांना सरकारला टार्गेट करण्याची संधी मिळाली असून या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याचे कुठलेही आदेश पोलिसांना दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
समीर वानखेडेंवर पाळत ठेवण्याचे कुठलेही आदेश दिलेले नाहीत, दिलीप वळसे पाटलांनी आरोप फेटाळले.
महिना १०० कोटी वसुलीचे तरी कुठे लेखी आदेश दिले होते? असे आदेश तोंडीच द्यायचे असतात हे जनतेला ठाऊक आहे वळसे पाटील साहेब? pic.twitter.com/03gjotRola— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 12, 2021
वळसे पाटील यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, महिना १०० कोटी वसुलीचे तरी कुठे लेखी आदेश दिले होते? असे आदेश तोंडीच द्यायचे असतात हे जनतेला ठाऊक आहे वळसे पाटील साहेब? असं म्हणत खोचक टीका भातखळकर यांनी वळसे पाटील यांच्यावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची करडी नजर?; पुराव्यासह केला आरोप
- ‘जर धोनी भाई खेळत नसेल तर…’, सुरेश रैनाचा आयपीएल निवृत्ती योजनेबद्दल मोठा खुलासा
- आरसीबी फक्त 10 खेळाडूंसह खेळत होता; परभावानंतर सेहवाची संघावर टीका
- आमदार शिंदे फसवणूक करण्याच्या तयारीत, शेतकऱ्यांनी कोणत्याही कागदपत्रांवर सही करू नये – नारायण पाटील
- ‘हा प्रश्न मला विचारू नका’ म्हणत चालू मुलाखतीतून माईक फेकून मलिक निघून गेले


