औरंगाबाद : कोविड केअर सेंटर म्हटल्यावर एक इमेज डोक्यात असते. मात्र मेल्ट्रोन सेंटर बघून सुखद धक्का बसला. शासकीय कोविड सेंटर इतके चांगली असू शकते याची कल्पना नव्हती. एक वर्षापासून मनाने आणि शरीराने न थकलेले डॉक्टर्स नर्सेस यांचे खूप कौतुक आणि एक नागरिक म्हणून आभार व्यक्त करतो. महानगरपालिकेच्या चिकलठाणा एमआयडीसी येथील मेल्ट्राॅन कोविड केअर सेंटरला रविवारी एमजीएम हॉस्पिटलचे कोविड अतिदक्षता तज्ञ डॉ. आनंद निकाळजे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांचे मार्गदर्शन व निर्देशानुसार मेल्ट्राॅन कोविड केअर सेंटरचे कामकाज सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून या कोविड सेंटरमध्ये कोविडसह इतर रुग्ण सेवा यशस्वीपणे सुरू आहे. आज रविवारी एमजीएम चे कोविड अतिदक्षता तज्ञ डॉक्टर आनंद निकाळजे यांनी मेल्ट्राॅन कोविड केअर सेंटर ला भेट दिली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, डॉ. वैशाली मुदखेडकर ह्या होत्या.
येथील सोयी सुविधा बघून ते म्हणाले की, शासकीय कोविड सेंटर इतकी चांगली असू शकते याची कल्पना नव्हती. आपण असे अनेक रुग्णांना येथे उपचार करून बरे केले आहेत. मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर आणि सर्व रुग्णांशी आपुलकीने उपचार करणाऱ्या सर्वांचे त्यांनी कौतुक केले. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि पुढील काही महिने लढण्याची तयारी ठेवावी. असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादकरांनो सावधान! शहरात २६ कन्टेनमेंट झोन्स तर ८ भाग बिगेस्ट ‘हॉटस्पॉट’
- ‘कृष्णा पाटील हे गद्दारच’ मंत्री अब्दुल सत्तारांचा आरोप
- ‘100 कोटींसह इतर प्रश्न कोणी विचारू नयेत म्हणून लॉकडाऊन केला जातोय’
- या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील ; पंकजा मुंडेंचे मोठे विधान
- ‘जम्बाे’ लसीकरण मोहीमेत ‘मनपा’चा सावळा गोंधळ! अनेक ठिकाणी नागरिक आल्या पावली परतले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
