Share

चिंता! पावसाळा उरला महिनाभर, उजनी धरण फक्त ६२ टक्के भरलेले

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : उजनी धरण जुलै महिन्यातच मृतसाठ्यातून बाहेर आले तरी दमदार पाऊस न झाल्याने धरणातील पाणीसाठा दोन टक्क्याने कमी झाला आहे. जुलैअखेरीस उजनी धरणात ६३ टक्के पाणीसाठा होता. पण सप्टेंबर महिन्यात त्यात घट होऊन ६२ टक्क्यांवर आला आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यात धरणक्षेत्र परिसरात दमदार पाऊस झाला तरच उजनी १०० टक्के होण्याची शक्यता आहे. उजनी धरणात ७ सप्टेंबर रोजी एकूण ९६.७७ टीएमसी साठा असून, उपयुक्त पाणीसाठा ३३.६० टीएमसी आहे.

पुणे जिल्ह्यातील पाऊस गडप झाल्याने उजनी धरणातील पाण्याची पातळी ६२ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत खालावली होती. सध्या दौंड परिसरात संततधार सुरू असल्याने दौंडमधून उजनीमध्ये ४९५० क्युसेकनी विसर्ग सुरू आहे. दोन दिवसामध्ये उजनीत दोन टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. बुधवारी ६२.७० टक्क्यांपर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे.

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर दमदार पावसाची आवश्यकता आहे. आता महिनाभरात पावसाळा संपणार आहे. तरीही यंदा धरणे भरलेली नाही. अशीच परिस्थिती राहिल्यानंतर उन्हाळ्यात पाण्याची चिंता वाढणार आहे. बुधवारी सायंकाळी उजनीची एकूण पाणीपातळी ४९५ मीटर होती, तर एकूण पाणीसाठा ९७.२० टीएमसी होता. उपयुक्त पाणीसाठ्याचा ३३.६० टीएमसी झाला आहे, तर टक्केवारी ६२.६० टक्के झाली आहे.

मागील वर्षी उजनी धरणात याच दिवशी एकूण १२२.३६ टीएमसी पाणीसाठा होता, यापैकी ५८.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी १०९ टक्के होती. पण यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याने उजनी धरणातून पुणे जिल्ह्यात पुरेसा विसर्ग आलाच नाही. सप्टेंबर महिन्यातही त्यात वाढ होण्याची शक्यता कमीच आहे.

मध्यम प्रकल्पात ५७.२२ टक्के पाणीसाठा
जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पात सरासरी ५७.२२ टक्के पाणीसाठा आला आहे. यामध्ये बोरी व पिंपळगाव ढाळे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. हिप्परगा ६०, हिंगणी ३८, जवळगाव ७३, मांगी २१, आष्टी ४४ टक्के भरले आहेत. मध्यम प्रकल्प भरण्यासाठीही दमदार पावसाची गरज असणार आहे. उर्वरित सप्टेंबरमध्ये दमदार पाऊस झाल्यास मध्यम प्रकल्प भरण्यास मदत होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!