Share

नोकर झाला करोडपती..! १४ कोटींची लॉटरी लागल्यावर मालकाला केला फोन; म्हणाला, ”मी आता…”

Published On: 

एका कारखान्यात काम करणारी व्यक्ती अचानक करोडपती झाली. त्याला २ दशलक्ष डॉलर्स (१४ कोटींहून अधिक) बक्षीस मिळाले. तो करोडपती होताच त्याने आपल्या बॉसला फोन केला आणि म्हणाला, “मी आता कधीच कामावर येणार नाही”. चला तर मग जाणून घेऊया एका झटक्यात करोडपती बनलेल्या व्यक्तीची कहाणी.

हे प्रकरण कुंब्रियामधील कार्लिले येथील आहे. जिथे ६१ वर्षीय इयान ब्लॅक पिरेली कारखान्यात काम करायचे. एके दिवशी रात्रीची शिफ्ट संपवून ते कामावरून परतत होते. त्यांचे मन भटकले आणि वाटेत थांबून एक वर्तमानपत्र विकत घेतले. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, त्याचदरम्यान त्याची नजर नॅशनल लॉटरीवर पडली. त्याने लॉटरीत आपले नशीब आजमावण्याचे ठरवले आणि मोनोपॉली डिलक्स स्क्रॅच कार्ड विकत घेतले. त्यानंतर त्याचे नशीब फळफळले इयान ब्लॅकला लॉटरी जिंकल्याचे कळताच त्यांच्या आनंदाला  सिमाच उरली नाही. त्यांना २ दशलक्ष डॉलर्सची लॉटरी लागली होती.

त्साही इयानने घरी पोहोचताच आपल्या ५५ वर्षीय पत्नी सँड्राला लॉटरीचे तिकीट तपासण्यासाठी बोलावले. इयान ब्लॅक त्याच्या पत्नीला म्हणाला, “मला वाटत नाही की मी इतके शून्य पाहिले आहेत. हे खरेच २ मिलियन आहेत का?” यानंतर इयान ब्लॅकने ताबडतोब त्याच्या कारखान्याच्या मालकाला फोन केला आणि म्हणाला, “मला वाटत नाही की मी या आठवड्यात कामावर येईन किंवा पुन्हा येणार नाही.” हे ऐकून मालकाला धक्काच बसला.

इयान आणि त्याच्या पत्नीने सांगितले की प्रथम ते त्यांच्या पाळीव कुत्र्यावर शस्त्रक्रिया करतील, जी पैशांअभावी थांबली होती. त्याच्या पायाची हाडे जोडावी लागतात. यानंतर ते जमीन खरेदी करून आपल्या स्वप्नातील घर बांधणार आहेत. या जोडप्याला पाच मुले आणि १० नातवंडे आहेत, जे सर्व सध्या भाड्याने राहतात.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!