मुलुंड : गेल्या काही दिवसांत झालेल्या पाऊसामुळे मुलुंड पश्चिम येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावर असंख्य खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना येथून वाहन चालवणे धोक्याचे झाले होते. विशेषतः रिक्षातील प्रवासी तसेच रुग्णवाहिकेमधील रुग्णांना येथून मार्गक्रमण करताना त्रास होत होता. परंतु मुलुंड पश्चिमेचे विभाग क्र १०३ चे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मनोज थटेर यांनी टी वॉर्ड पालिका अधिकाऱयांशी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच फेसबुक सारख्या सोशिअल मीडियावर उठवलेल्या आवाजामुळे पालिकेने येथील खड्डे बुजवायच्या कामाला सुरुवात केली खरी परंतु शास्त्रोस्त पद्धतीने येथील खड्डे न बुजविता तात्पुरती मलम पट्टी केली जात असल्यामुळे हे काम जास्त दिवस ठिकणार नाही, असा आरोप मनोज थटेर यांनी केला आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गाच्या एका बाजूला विभाग क्र १०३ आहे तर दुसऱ्या बाजूला १०४ आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. परिसरातील नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रश्नी सोशिअल मीडियातून आवाज उठवला होता परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या संबंधित पालिका अधिकाऱयांनी रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्षच केले होते. त्यामुळे वाहनचालकांना येथून जाताना खड्ड्यातील रस्ता शोधत जावे लागत होता. राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मनोज थटेर सातत्याने खड्ड्याच्या समस्येकडे पालिकेच्या अधिकाऱयांचे लक्ष वेधत होते. अखेर पालिकेला हे खड्डे बुजविण्यासाठी आज भर पावसाचा मुहूर्त सापडला. या कामाच्या देखरेखीसाठी पालिकेचा ना सुपरवायझर, ना अधिकारी उपस्थित होता तसेच पाऊस पडत असतानाही खड्ड्यात खडीमिश्रित डांबर टाकून तात्पुरता पॅच मारायचे काम कंत्राटदाराचे कामगार करत होते. शास्त्रोस्त पद्धतीने येथील खड्डे न बुजविले गेल्याने तात्पुरते मारलेले पॅच जास्त दिवस ठिकणार नाहीत व लवकरच येथे पुन्हा नव्याने खड्डे होतील, अशी भीती व्यक्त करत करदात्या नागरिकांच्या पैश्याचा अपव्यय येथे चालला असून, या थूक लावायच्या कामात संबंधित पालिका अधिकारी व कंत्राटदाराचे काही आर्थिक लागेबांधे आहेत का, असा प्रश्न मनोज थटेर यांनी यानिमित्ताने विचारला आहे.
आनंदाची बातमी : सोमवारी राज्यात एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक
संबंधित पालिका अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्यामुळे संपर्क होवू शकला नाही म्हणून पालिकेच्या लँडलाईनवर संपर्क साधला असता, मेन्टेनन्स खात्यातील कारकून पाटील यांनी संबधित अधिकाऱ्याला फोन जोडून देण्यात नकार दर्शवला तसेच अधिकारी फोन घेवून बसत नाही, असे उद्धटपणे बोलून फोन ठेवून दिला.
परंतु दुरुस्ती खात्याच्या या गलस्थान कारभाराबद्दल व निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल परिसरातील नागरिकांनी व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असंतोष व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या दु:खाचे निराकरण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशिल – नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

