Share

आनंदाची बातमी : सोमवारी राज्यात एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक

Published On: 

मुंबई : राज्यात सोमवारी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख २८ हजार ५१४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ५५ हजार २६८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. कालच्यापेक्षा आज राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सोमवारी निदान झालेले ८४९३ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २२८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७५३ (४०), ठाणे- १३७ (३), ठाणे मनपा-२१२, नवी मुंबई मनपा-२५० (८), कल्याण डोंबिवली मनपा-२४९ (२), उल्हासनगर मनपा-१६ (६), भिवंडी निजामपूर मनपा-४ (२), मीरा भाईंदर मनपा-८४ (१), पालघर-१०५, वसई-विरार मनपा-६९ (२), रायगड-११५ (१०), पनवेल मनपा-११०, नाशिक-२१९ (२), नाशिक मनपा-५३५ (५), मालेगाव मनपा-५६ (१), अहमदनगर-२३५ (२), अहमदनगर मनपा-८५ (१), धुळे-४३ (२), धुळे मनपा-३८ (१), जळगाव-२९६ (९), जळगाव मनपा-६६ (२), नंदूरबार-२, पुणे- ३४१ (९), पुणे मनपा-९१९ (२६), पिंपरी चिंचवड मनपा-६१५ (१९), सोलापूर-१९९ (६), सोलापूर मनपा-५४ (१), सातारा-२०५ (११), कोल्हापूर-२१३ (५), कोल्हापूर मनपा-१२६ (२), सांगली-१२६ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१९० (४), सिंधुदूर्ग-६१, रत्नागिरी-५५, औरंगाबाद-११९ (१), औरंगाबाद मनपा-११६ (३), जालना-२०६ (१), हिंगोली-०, परभणी-२२, परभणी मनपा-३१ (१), लातूर-७४ (१२), लातूर मनपा-५८ (४), उस्मानाबाद-१५२ (६), बीड-८० (२), नांदेड-६६ (२), नांदेड मनपा-४३ (२), अकोला-४, अकोला मनपा-१३, अमरावती-१४, अमरावती मनपा-७५, यवतमाळ-३० (२), बुलढाणा-४५ (२), वाशिम-६१, नागपूर-८० (१), नागपूर मनपा-३५१ (४), वर्धा-५, भंडारा-१९, गोंदिया-१५, चंद्रपूर-९, चंद्रपूर मनपा-७, गडचिरोली-१३, इतर राज्य २.

शेतकऱ्यांच्या दु:खाचे निराकरण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशिल – नाना पटोले

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३२ लाख ०६ हजार २४८ नमुन्यांपैकी ६ लाख ०४ हजार ३५८ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ६५९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ५५६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के एवढा आहे.

गणेशोत्सव : पुण्यातील मानाचे पाच गणपती मंडपातच होणार विराजमान

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!