Share

दिल्ली सरकारची मोठी घोषणा ; महिलांना बस, मेट्रो प्रवास मोफत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीमध्ये महिला प्रवाशांसाठी बस आणि मेट्रोतील प्रवास मोफत करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी या निर्णयाची घोषणा केली. दिल्लीमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून रोज प्रवास करणाऱ्या ४० लाख प्रवाशांपैकी ३० टक्के महिला आहेत. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

तिकिटे महाग असल्यामुळे काही महिला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील विविध वाहतूक पर्यायांचा वापर करीत नव्हत्या. पण आता या सर्व पर्यायांमधून प्रवास मोफत झाल्यामुळे महिला या सर्व पर्यायांचा गरजेप्रमाणे वापर करतील, अशी अपेक्षा अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.दिल्लीमध्ये महिलांची सुरक्षितता वाढविण्यासाठी आमच्या सरकारने केलेली ही गुंतवणूक आहे. त्याचबरोबर ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांनी या सवलतींचा वापर करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!