पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत असून कोरोना बाधितांची संख्या देखील अधिक आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये नव्या कोरोना रुग्णांचा आकडा हा १ हजारांच्या खाली आहे. दरम्यान, पुणे शहरात आज नव्याने २९७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७२ हजार २५४ इतकी झाली आहे. तर, शहरातील ५४९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ५९ हजार ५६४ झाली आहे.
दरम्यान,शहरात आज नव्या कोरोना बाधितांमध्ये घट होण्यासह मृत्युसंख्येत देखील घट झाली आहे. आज कोरोनाने १६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४ हजार २९५ रुग्णांपैकी ६६२ रुग्ण गंभीर तर १,३०९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझी वसुंधरा’ अभियानात वैजापूर नगरपरिषदेने मारली बाजी
- मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार पंतप्रधान मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांच महत्वाचं विधान
- ‘संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल आदर, आरक्षणासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा’
- ‘पवारांनी आंदोलन केलं तर त्यांच्याही पाठी उभे राहू; संभाजीराजे तर आमचे राजे आहेत’
- ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असे आपल्याला वागावे लागेल – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

