पुणे:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. पदवीधर निवडणुकांचा निकाल समोर येताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना एका व्यक्तव्यावरून चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. याबद्दल थेट चंद्रकांत पाटील यांनाच विचारलं असता त्यांनी मौन बाळगला आहे.
पदवीधर निवडणुकांमध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती.
भाजपचा पराभव झाला आता तुम्ही हिमालयात जाणार का? असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी मौन बाळगलं. त्यांच्या या प्रतिक्रियेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यांच्या याच वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक बड्या नेत्यांनी त्यांना टार्गेट केलं होतं. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी झाला आहे, अशी खोचक टिप्पणी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकरी आपल्या एका दणक्यात बैलाला सरळ करू शकतो, हे तर केंद्रातील मोदी सरकार आहे’
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- ‘विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शिष्यवृत्ती व विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नाबाबत तातडीच्या उपाययोजना करा’
- ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात 14 डिसेंबरपासून होणार मोठा बदल
- ‘रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला भारदस्तपणा मिळवून देणाऱ्या अभिनेत्याला आपण मुकलो’

