Share

‘पांडुरंगाच्या पावन सोलापूर जिल्हयाच्या विकासासाठी संपूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहीन’

Published On: 

सोलापूर : सध्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्या आजारी असल्याने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पुन्हा एकदा बदलले आहेत. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबबदारी देण्यात आली आहे. दत्तात्रय भरणे हे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अशा संकटकालीन परिस्थितीत दत्तात्रय भरणे सोलापूरच्या स्थानिक प्रशासनाशी योग्य प्रकारे समन्वय साधू शकतात. त्यामुळे दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

सोलापूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाबारोबर समन्वय साधण्यासाठी पालकमंत्र्याची आवश्यकता होती. मात्र जितेंद्र आव्हाड हे स्वतः कोरोनाच्या संसर्गाने क्वारांनटाईन असल्याने सोलापूरचे पालकमंत्री पद पुन्हा धोक्यात आले.

राज्यांमध्ये महाविकासआघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती झाली होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे पालकमंत्री पदाची जबाबदारी काढावी, अशी विनंती केल्यानंतर त्यांच्याकडील पालकमंत्रिपद जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिले होते.

सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्याचा पालकमंत्री नियुक्त करण्याची मागणी केली. त्यानुसार अजित पवार यांनी दत्ता भरणे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्त करणार असल्याचे आश्वासन दिले असून त्याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे, अशी माहिती दिली होती.

दत्तात्रेय भरणे यांचं ट्वीट –

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी ट्वीटरवर आपण जिल्ह्याच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असं म्हटलं आहे. ते म्हणाले,

‘महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पांडुरंगाच्या पावन नगरीचा म्हणजेच सोलापूर जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून मला आज जबाबदारी देण्यात आली. संपूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सोलापूरच्या विकासासाठी मी प्रयत्नशील राहीन. त्याचबरोबर देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाला आपण सर्व सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या मदतीने हरवून लावू ही समस्त सोलापूरवासीयांना मी ग्वाही देतो.’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!