Share

कोरोनासाठी १४ वा वित्त आयोग व पेसा निधीतून खर्च करण्यासाठी नियोजन होणार ?

Published On: 

नाशिक : कोरोनाशी लढा देतांना कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू नये, तसेच आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, यासाठी १४ व्या वित्त आयोग व पेसातील निधीचा काही भाग खर्च करण्या संदर्भातील नियोजन करण्यात यावे, असे मत विधानसभा उपाध्यक्ष नरही झिरवाळ यांनी व्यक्त केले. त्र्यंबकेश्वर येथील तहसील कार्यालयात इगतपुरी व त्र्यबंकेश्वर या दोन्ही तालुक्यातील महसूल, आरोग्य, पंचायत समिती व नगरपरिषदेने केलेले कामाकाज व येत्या काळात करण्यात येणाऱ्या उपापयोजनांबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत आमदार हिरामण खोसकर, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे, त्र्यंबकचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगांवकर. उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, पोलीस उपविभागीय अधिकारी भिमाशंकर ढोले, अर्चना पागिरी, दीपक गिरासे, गट विकास अधिकारी किरण जाधव, मधुकर मुरकुटे, त्र्यंबकेश्वरचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, इगतपुरीचे मुख्याधिकारी निर्मल गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, डॉ. मंदाकिनी बर्वे उपस्थित होते. झिरवाळ म्हणाले, कोरोनाला लढ्या देण्यासाठी शक्य तितका आपल्याकडील निधी उपलब्ध करून घ्यावा. त्यातून इगतपुरी व त्र्यबंकेश्वर तालुक्याला आवश्यक असणारी वैद्यकीय उपकरणे विकत घेण्यात यावीत. तसेच या निधीच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावाला दोन थर्मल गन व एक पल्स ऑक्सीमिटर खरेदी करावे, जेणेकरुन कोरोनाचे निदान करण्यासाठी गावपातळीवर मदत होईल व या उपकरणांच्या मागणीची माहिती ग्रामसेवकाकडून घेण्यात यावी, असेही झिरवाळ यांनी सांगितले.

पालखीच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज

धान्य वितरणात गैर व्यवहार रोखण्यासाठी दक्षता घेण्यात यावी
धान्य वितरण करतांना प्रत्येक व्यक्तीला धान्य मिळावे यासाठी पुरवठा विभागाने धान्य वितरण व्यवस्था तत्काळ अद्ययावत करावी. तसेच धान्य वितरण करतांना कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. ग्राहकांना धान्याचे भाव स्पष्ट दिसावेत यासाठी प्रत्येक रेशन दुकानदारांना जाहिरात फलक ठळक अक्षरात लावण्याची सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केली. आत्तापर्यंत करण्यात आलेला धान्य वितरणाचा यावेळी त्यांनी आढावा घेतला.

पालखीनिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत ‘असे’ असतील बदल

कोरोनामुळे शहरातील बरेच लोक आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे गाव पातळीवर रोजगार हमी योजनेतंर्गत कामांची मागणी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असल्याने जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून देण्याबाबत दोन्ही तालुक्यांनी प्रयत्न करावेत, असे झिरवाळ यांनी सांगितले. कोरानासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा १४ वित्त आयोग व पेसातील निधीमधून खरेदी करण्यात याव्यात. तसेच त्र्यंबकेश्वरला आवश्यक असणाऱ्या व्हेंटीलेटर,पीपीटीई किट, लिक्वीड सोप सोल्यूशन, डिजीटल बीपी मशीन, ट्रीपल फेस मास्क आदीची आवश्यक मागणी शासनाला कळविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कामकाजाची माहिती घेवून आढावा घेतला. तसेच तालुका वैद्यकिय अधिकारी मोरे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीन क्वारंटाइन केंद्र असून, त्यात ३०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोरोना केअर सेंटर दोन कार्यरत असून त्यात १८० बेडची व्यवस्था करण्यात आली असून प्रस्तावित सेंटर मध्ये ४४० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये ५० बेडची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच दोन्ही तालुक्यातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबतही त्यांनी माहिती घेतली.यावेळी अधिकाऱ्यांना उपाध्यक्षांच्या हस्ते सॅनिटायझर, मास्क, साबण, ग्लोझ या किटचे वाटप करण्यात आले.

पोलिसांची धडक कारवाई, 1200 लीटर रसायन नष्ट, 3 हातभट्टया उध्वस्त

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!