Share

पोलिसांची धडक कारवाई, 1200 लीटर रसायन नष्ट, 3 हातभट्टया उध्वस्त

Published On: 

पेण : देशभरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. कोरोना या जीव घेण्या विषाणूस रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जाहिर करण्यात आला. याकाळात राज्यातील दारू दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दुकानेही बंद असल्याने मद्यप्रेमींचे पुरते हाल सुरू असले तरी दुसरीकडे अवैध दारूचा सुळसुळाट झाला आहे.

बिअर बारसह देशी आणि वाईन शॉप बंद असल्याने मागील कित्येक महीने बंद असलेल्या गावठीच्या भट्या पुन्हा पेटल्या आहेत. देशी विदेशीचे दर गगनाला पोहचल्याने गावपातळीवर नदी नाल्यांबरोबरच दऱ्या खोऱ्यांमध्ये बनवल्या जाणाऱ्या गावठी दारूने शहरात शिरकाव केल्याने पोलीस प्रशासन सक्रिय झाले आहे.

चोरी छुप्या रीतीने गावठी दारूचे अड्डे सुरु असलेल्या अड्ड्यांवर पेण पोलिसांनी कारवाई केली आहे.संचारबंदी जाहिर होताच पेण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक दिलीप वेडे आणि त्यांच्या पथकाने विभागीय उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार मद्यवाहतूकीबरोबरच अवैध दारूनिर्मीती आणि विक्री रोखण्यासाठी संपूर्ण तालुक्यात धाडसत्र सुरु केले आहे.

या विभागाने 24 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान धडाकेबाज कारवाई करीत 3 हातभट्टया उध्वस्त केल्या यात 1200 लीटर रसायन आणि कच्चा माल नष्ट केला असून सुमारे 50 हजारांहुन अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस उप निरीक्षक नरेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार तड़वी आणि पो. हवालदार सचिन चौरे यांनी पेण तालुक्यातील महलमिऱ्या डोंगर भागातील बांगलवाडी आणि भोंगोली या भागात केली. घटनास्थळावरून आरोपीं पोलिसांना गुंगारा देत दऱ्या खोऱ्यात पलायन करण्यात यशस्वी झाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!