औरंगाबाद : कोरोनाच्या परिस्थितीमुळे सध्या शाळा मागील वर्षी पासून बंद आहे. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येत असतो. यंदा खर्चात कपात करत विद्यार्थ्यांना दोन ऐवजी एकच गणेवश देण्यात येणार होते. पुन्हा कोरोनाचे कारण पुढे करत मागील वर्षी खरेदीच झाली. त्याचे पैसे सध्या जमा झाले असून, यंदा देखील शैक्षणिक सत्र नेमके कधी सुरु होणार? शाळा सुरु झाल्या नाही तर गणवेश मिळेल का नाही असे प्रश्न निर्माण होत असून, यंदा देखील विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार का? असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे.यासाठी पुरेसा निधीच नसल्याचा दावा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, एससी-एसटी, दारिद्रयरेषेखालील पालकांच्या पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या पाल्यास, सर्व विद्यार्थीनींना शालेय गणवेश देण्यात येतो. प्रती गणवेश तीनशे रुपये असे दोन गणवेशासाठी देण्यात येतात. मात्र, मागील शैक्षणिक वर्षात संपूर्ण गणवेश खरेदी झालीच नाही. मुलांना एकच गणवेशासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्यासाठी समग्र शिक्षा अभियांतर्गत १ कोटी ७५ लाख २० हजार ६०० रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. या निधीतून पाचवीते आठवीच्या एकूण ५८ हजार ४०२ मुलांना गणवेशाचे वाटप करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
पहिली ते चौथीचे वर्गच सुरु झाले नाही. ते कधी सुरु होतील याबाबत स्पष्टता नसल्याने या विद्यार्थ्यांना मागील वर्षी गणवेशच देण्यात आले नाहीत. केवळ पाचवी ते आठवीच्या ५८ हजार ४०२ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले. तर शाळा सुरु होवू न शकल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या एकूण ८७ हजार ९१५ लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप झालेच नाही.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मागची खरेदीची प्रक्रिया झालेेली नाही. शिवाय एकच गणवेश देण्यात येणार होता. परंतु शाळाही भरल्या नाही. १ जूनच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अस्पष्टता असल्याचे जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?
- ‘ते राणीच्या बागेत आंदोलन करत नव्हते, शिवसेना भवनाची गरिमा आहे’; शिवसेना नेता संतापला
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- ‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा

