Share

नगर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला तर याची जबाबदारी रोहित पवार घेणार का ?

Published On: 

अहमदनगर : आज संपूर्ण राज्य दसऱ्याचा सण साजरा करत असताना अहमदनगर जिल्ह्यात रोहित पवार यांच्या कार्यक्रमाची सध्या चर्चा जोरात होताना दिसत आहे.या मागचे कारण होते ७४ मीटर भगव्या ध्वजाचा अनावरण सोहळा. रोहित पवार यांनी आज या ध्वजाचे लोकार्पण जंगी कार्यक्रम घेऊन केले.

या कार्यक्रमादरम्यान कोरोना नियमांना आयोजकांनी अक्षरशः हरताळ फासल्याचे दिसून आले. हजारो नागरिकांची गर्दी यावेळी झाल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमात लोकांनी मास्कचा वापर केलेला नसल्याचे दिसत तर आहेच मात्र दस्तुरखुद्द रोहित पवार हे देखील मास्क शिवाय या कार्यक्रमात वावरताना दिसत आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमविल्याने तसेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती म्हणावी तेवढी बरी नसल्याने या कार्यक्रमाचे आयोजन का करण्यात आले याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटत असतांना नगर जिल्ह्यातील चिंता मात्र कायम आहे. परिस्थिती एवढी नाजूक आहे की नगर प्रशासनाने ६१ गावात लॉकडाउन जाहीर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढला होता.

दरम्यान रोहित पवार यांच्या झालेल्या या कार्यक्रमात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळाली तसेच अनेक लोकांनी मास्कचा वापर केलेला दिसत नाही. आता जर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले तर या सर्वासाठी कोण जवाबदार असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय. जर पुन्हा नगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला तर याची जबाबदारी रोहित पवार घेणार का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!