🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: एकदिवसीय क्रिकेट (One Day International ODI) संपुष्टात येणार का? असा प्रश्न क्रिकेटच्या चाहत्यांना सतावत आहे. कारण जगात एकदिवसीय क्रिकेटची लोकप्रियता टीव्हीवर असो किंवा स्टेडियममध्ये दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पण ही बाब फक्त प्रेक्षकांवर आधारित नाही. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ही पूर्वीसारखा वनडे सामन्यांचा आनंद लुटत नाहीत. अशा परिस्थितीत क्रिकेटपटूंची मोठी संघटना FICA ने एक रिपोर्ट जारी केला आहे.
फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन (FICA) ने नुकतेच जगातील 400 खेळाडूंची सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणामध्ये खेळाडूंना सर्व प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. टी-20 क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे इतर दोन फॉरमॅटवर कसा परिणाम झाला आहे? वनडे आणि कसोटी सामन्यांच्या अस्तित्वावर संकट आहे का? जर होय, तर कोणत्या फॉरमॅट आधीच धोक्यात आहे? असे प्रश्न विचारले असता, अनेक खेळाडूंकडून ‘एकदिवसीय क्रिकेट’ हे उत्तर समोर आले आहे.
FICA ने 2018-19 मध्ये देखील असेच एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये किती खेळाडू एक दिवसीय विश्वचषक हा सामना आयसीसी चॅम्पियनशिप मानतात? हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर 86 टक्के खेळाडूंनी सांगितले होते की एक दिवशी विश्वचषक सामना आयसीसी नंबर-1 चॅम्पियनशिप आहे. हाच प्रश्न यावर्षी विचारण्यात आला होता. यावर्षी केवळ 54 टक्के क्रिकेटपटूंनी एक दिवसीय विश्वचषक ला नंबर-1 इव्हेंट म्हटले आहे. यावरून असे लक्षात येते की क्रिकेटपटूंना आता एकदिवसीय सामना नकोसा झाला आहे.
जगातील एकदिवसय सामन्यांची सरासरी पाहिली तर, त्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. 2021 मध्ये 93 एकदिवसीय सामने खेळले गेले होते. यामध्ये जर 2020 वर्ष सोडले तर गेल्या अनेक वर्षापासून 2021 मध्ये सर्वात कमी 2021 सामने खेळले गेले आहेत. 2020 मध्ये जगावर कोरोनाचे संकट आले होते. त्यामुळे सर्व क्षेत्रांवर वाईट परिणाम झाला होता. त्याचबरोबर क्रिकेट क्षेत्र ही अनेक दिवस ठप्प होते. त्यामुळे आपण 2020 च्या आकडेवारीकडे दुर्लक्ष केले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “…तर तुम्ही मूर्ख आणि खोटारडे आहात”; उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- Sam Bahadur Teaser | ‘या’ दिवशी रिलीज होणार विकी कौशलचा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ बायोपिक
- Pak vs ENG | इंग्लंड संघातील खेळाडूंवरील संकट टळले, PBC ने दिली ‘ही’ मोठी माहिती
- TVS Launch | टीव्हीएस RTR Apache 160 4V स्पेशल एडिशन लाँच
- Pak vs ENG | “माझी इंग्रजी संपली…”; पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पाकिस्तानी गोलंदाजाने दिले उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
