Share

Sam Bahadur Teaser | ‘या’ दिवशी रिलीज होणार विकी कौशलचा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ बायोपिक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार विकी कौशल (Vicky Koushal) सध्या त्याच्या ‘गोविंदा मेरा नाम’ (Govinda Naam Mera) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशात विकी कौशलने आज त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सॅम बहादूर’ (Sam Bahadur) चा पहिला टीजर रिलीज केला आहे. विकीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचा पहिला टीजर शेअर केला आहे. त्याचबरोबर विकीने या पोस्टसह या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे. विकी कौशलचा हा चित्रपट फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक आहे.

टीजरमध्ये विकी कौशल वर्दी परिधान करून मार्ग वाढत बाहेर पडताना दिसत आहे. यामध्ये विकी त्याच्या टोळीच्या मधून चालताना दिसत आहे. टीजरमध्ये विकीचा चेहरा दिसत नसला, तरी विकी चालत असताना तो किती शक्तिशाली आहे, हे मात्र दिसत आहे. हा टीजर व्हिडिओ शेअर करत असताना विकीने त्याला कॅप्शन दिले आहे की,” फक्त 365 दिवस बाकी…#Samबहादुर 1.12.2023 सिनेमागृहामध्ये.”

सॅम बहादूर या चित्रपटांमध्ये अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ बायोपिक यांच्या जीवनावर आधारित आहे. पाकिस्तान युद्धादरम्यान फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ एक भारतीय लष्कराचे प्रमुख अधिकारी होते.

सॅम बहादूर (Sam Bahadur) चित्रपटातील इतर कलाकार

या चित्रपटांमध्ये विकी कौशल व्यतिरिक्त सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक , रिचर्ड भक्ती क्लेन, साकिब अयुब आणि कृष्णा हे कलाकार दिसणार आहेत.

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या ‘गोविंदा मेरा नाम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये विकी एका डांसरची भूमिका साकारत आहे. गोविंद मेरा नाम मध्ये विकीचा एक वेगळाच अंदाज दर्शकांसमोर आला आहे. या चित्रपटामध्ये विकी व्यतिरिक्त बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Ddvani) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) देखील मुख्य भूमिकेत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!