टीम महाराष्ट्र देशा: लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु कॉंग्रेसतर्फे पुण्यातील जागा अद्याप निश्चित नाही. त्यामुळे कॉंग्रेसने पुणे लोकसभा मतदार संघात उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांना आज दिल्लीत बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीला कॉंग्रेसचे जेष्ठ नेते उपस्थित असणार आहेत.
पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी संजय काकडे, प्रवीण गायकवाड, अरविंद शिंदे, मोहन जोशी यांची नावे आघाडीवर आहेत. संजय काकडे आणि प्रवीण गायकवाड यांची नावे आता मागे पडली आहेत. त्यामुळे या बैठकीत अरविंद शिंदे किंवा मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मोहन जोशी हे माजी आमदार आहेत तर अरविंद शिंदे हे महापालिकेत कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आहेत. या दोन्ही नावांना प्रदेश कॉंग्रेसचा पाठींबा आहे.
पक्षश्रेष्ठींसोबत होणाऱ्या बैठकीनंतर वरीलपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसतर्फे पुणे लोकसभेसाठी लवकरच उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
