🕒 1 min read
पुणे : कोरोनाच्या संकटात देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधी पक्ष भाजप राज्य सरकारवर टीका करण्याची एक संधी सोडत नसल्याचं दिसत आहे. तर सत्ताधारी देखील आपल्या शैलीत विरोधकांना उत्तर देत आहेत.
एकीकडे कोरोना, लॉकडाऊन, रेड झोन, नियम-अटी या सगळ्या धबडग्यात राज्यातली जनता व्यस्त असताना दुसरीकडे राज्यात लवकरच एक राजकीय भूकंप होईल का? अशा प्रकारच्या चर्चांना उधान आल्याचे दिसून येत आहे. या सर्व राजकीय रणधुमाळीत बळीराजाच्या समस्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे.
करोनामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाच्या तोंडावर राज्य सरकारने शेतकऱ्यांना अडचणीत आणू नये; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
प्रभातने दिलेल्या वृत्तानुसार,करोनाच्या प्रादुर्भावाने उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याचे सांगून राज्य सरकारने महात्मा फुले कर्जमाफी योजना स्थगीत केली. तर संबंधित शेतकऱ्यांची कर्जाची शासनाकडून येणे दर्शवावी, असा आदेश काढला आहे. मात्र, मुळात जिल्हा बॅंकांकडे पैसे नाहीत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिका रुग्णालय डॉक्टरांशी साधला संवाद, म्हणाले…
आरबीआयचे न ऐकणाऱ्या बॅंका राज्य सरकारचे ऐकून शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्ज देतील का? असा सवाल उपस्थित करून शेट्टी म्हणाले, गेल्या वर्षी राज्य सरकारने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून 2 लाख रुपये थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असल्याचे जाहीर केले. 19 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याचे सरकारने जाहीर केले. मात्र, अद्यापही 11 लाख शेतकरी योजनेपासून वंचित आहेत.
#covid_19 : आतापर्यंत राज्यात 15 हजार 786 जणांनी केली ‘कोरोना’वर मात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
