Share

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार का ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई ते नागपूर महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले जाण्यची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा महामार्ग तयार करणे हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सुरवातीपासूनच समृद्धी महामार्गाचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात होता. त्यात गेल्या पाच वर्षात त्याच कामही संथ गतीने सूरु होते.आता पुन्हा या महामार्गाच्या नावावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारकडून या महामार्गाच्या नामकरणाला गती देण्यात येत आहे. या महामार्गाला दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव मोडीत काढत नवीन सरकारने मुंबई ते नागपूर या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे द्रुतगती महामार्ग नाव देण्याचा निर्णय़ घेतला आहे. आता याची केवळ घोषणा बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्यावेळी फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या नावावरून वाद नको, याचे नाव आधीच निश्चित झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव या द्रुतगती मार्गाला देण्यात येईल, याची शक्यता मावळली होती. दरम्यान आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या नामकरणाचा निर्णय सहजतेने झाल्याचे समजते.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1204266504214044672?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1204287548685606913?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!