Share

अमृता फडणवीस राजकारणात प्रवेश करणार का? देवेंद्र फडणवीसांनी केले सूचक वक्तव्य

Published On: 

पुणे : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली होती. ‘ठाकरे आडनाव असले तरी कोणी ठाकरे होत नाही. कुटुंब आणि सत्तेपलीकडे जाऊन लोकांसाठी प्रामाणिक काम करावे लागते,’ असे ट्विट अमृता यांनी केले होते. त्याचे तीव्र पडसाद राजकीय क्षेत्रात उमटत आहेत.

अमृता फडणवीस राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात रंगली आहे. अमृता फडणवीस यांच्या राजकारणात येण्याच्या शक्यतेवर बोलताना पती देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ राजकारणात प्रवेश करायचा किंवा नाही हा अमृताचा वैयक्तिक निर्णय असेल. पण माझ्या माहितीनुसार, ती कधीही राजकारणात येणार नाही. अमृता स्वत:चे निर्णय स्वत: घेते आणि त्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारीही स्वीकारते’ असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

पुण्यातील एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली. काही राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते त्यांना खालच्या पातळीवर ‘ट्रोल’ करतात. याआधीही अमृता यांना टीकेला सामोरे जावे लागले होते, असेही फडणवीस म्हणाले.

मी मुख्यमंत्री असताना त्या ५ वर्षांच्या काळात बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या. मला माझ्या जवळच्या मित्रांना पुरेसा वेळ देता आला नाही, या ५ वर्षात मला माझ्या लेकीला हॉटेलात जेवायला घेऊन जाण्याइतका वेळही मिळाला नाही अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1209394738433949696?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1209394593612980224?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!