टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मंगळवारी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी जनतेला भरघोस आश्वासन दिली. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार असल्याचं आश्वासन ठाकरे यांनी दिलं. तर युतीची सत्ता राज्यात आल्यानंतर 10 रुपयांत सामान्य माणसांना सकस जेवण दिले जाईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावरून अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेतून ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
अजित पवार म्हणाले की, गेल्या 5 वर्षात 10 रुपयांत का थाळी दिली नाही. गेल्या 5 वर्षात का कर्जमाफी दिली नाही. दोन्ही पक्षांचे मंत्री सरकारमध्ये होते, त्यांचंच सरकार होतं. पण, आजही महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली. मग शिवसेना गेली ५ वर्ष झोपा काढत होती का? असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांनाही लक्ष्य केले होते. आपण आता केलेल्या कर्मामुळे रडत आहात, अशी टीका ठाकरे यांनी केली होती. जनता जेव्हा पाण्याचा प्रश्न घेऊन तुमच्याकडे आली होती तेव्हा आपण त्यांना उलट उत्तर दिल होत म्हणूनचं आज रडण्याची वेळ आली आहे, असे ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181852684791402496?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181852535037972481?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181835478711988224?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

