Share

‘भारत माता की जय या घोषणेने ममता दीदींना एवढा राग का येतो’? ; मोदींचा सवाल

Published On: 

कोलकाता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे काही प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पश्चिम बंगाल विकासाची गती कायम राखण्यात कमी पडला, असे सांगत भारत माता की जय या घोषणेने ममता दीदींना एवढा राग का येतो, असा तिखट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकार आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली.

हल्दिया येथे एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात पश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत अनेक पटीने पुढे होते. बंगालमध्ये पायाभूत सुविधा उत्तम होत्या. नोकऱ्यांच्या अनेकविध संधी होत्या. भारतासह संपूर्ण जगाचे मार्गदर्शन करणाऱ्या बंगालला आजही मोठा सन्मान प्राप्त होतो. असे सर्व असताना विकासाची गती कायम ठेवण्यात बंगाल मागे का राहिला, अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी केली.

तसेच, पश्चिम बंगालमधील आजच्या स्थितीचे महत्त्वाचे कारण म्हणजे येथे विकासाचे राजकारण झाले नाही. काँग्रेस कार्यकाळात येथे भ्रष्टाचार होता. डाव्या पक्षांच्या काळातही भ्रष्टाचार फोफावला. मात्र, ममता बॅनर्जी यांनी परिवर्तनाचे आश्वासन दिले. त्यामुळे पश्चिम बंगालच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला. ममता बॅनर्जी यांच्याकडून जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, गेल्या १० वर्षात पश्चिम बंगालमध्ये विकास झाला नाही, हेच आजच्या घडीला स्पष्ट होते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!