मुंबई: उपनगर साकीनाका येथे एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. यावरूनच भाजपचे नेते आशिष शेळी यांनी संतप्त सवाल केला आहे.
‘उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेल्या साकीनाका येथील बलात्कार पिडीतेच्या नातेवाईक आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांची राजावाडी रुग्णालयात जाऊन आशिष शेलार यांनी भेट घेतली. अत्यंत संतापजनक ही घटना असून मुंबईत गुन्हेगारी एवढी मोकाट का झालीये? पोलीसांचा धाक का राहिला नाही? असा संतप्त सवाल शेलार यांनी केला आहे.
उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेल्या साकीनाका येथील बलात्कार पिडीतेच्या नातेवाईक आणि उपचार करणाऱ्या डाँक्टरांची राजावाडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. अत्यंत संतापजनक ही घटना असून मुंबईत गुन्हेगारी एवढी मोकाट का झालेय? पोलीसांचा धाक का राहिला नाही? असे प्रश्न उपस्थितीत होतात. pic.twitter.com/5dw0oCzMra
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 11, 2021
या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या प्रकरणी आरोपी मोहन चौहान (वय 45) याला घटनेनंतर अटक करण्यात आली आहे. साकीनाका पोलीस देखील या प्रकरणाचा प्रत्येक प्रकारे तपास करत आहेत. काल रात्री मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्वतः साकीनाका पोलीस स्टेशन गाठले आणि संपूर्ण घटनेची चौकशी केली.पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात फक्त एक आरोपी समोर आला आहे. पोलीस संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी करत असले तरी पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगलने तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?
- साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण

