🕒 1 min read
मुंबई : भाजपासोबतची युती तुटल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर खूप मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. दरम्यान एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना देखील अमराठी मतांसाठी जोरदारपणे तयारीला लागली आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेकडून यासाठी गुजरातींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला ही अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिवसेनेच्या या बदलत्या भूमिकेवर भाजप नेत्यांनी सडकून टीका केली होती. शिवसेनेने साद घातली असली तरी गुजराती मतदाराने मनात ठाम ठरवले आहे “मुंबई मा जलेबी ना फाफडा, ‘जनाबसेने’ला आपटा” असं म्हणत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला होता. आता शिवसेनेच्या हेमराज शाह यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
‘गुजराती माणसानं द्धव ठाकरे यांना ‘आपडा’ म्हटल्यावर भाजपच्या अतुल भातखळकर यांचा तीळपापडा का झाला? कालपासून ते खळ खळ का करताहेत? अतुल भातखळकर नेमके कोणाचे आहेत? भाजपला मत देणाऱ्या गुजराती माणसांचे की मराठी मातीत जन्मलेल्या मराठी माणसांचे?,’ असा सवाल करत शाह यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- दीपिकाच्या बर्थडे पार्टीला रणबीर अलियाची हजेरी; पहा फोटो
- नवख्या नवदीप सैनीसह हिटमॅन रोहित शर्माच्या खेळण्यावर अखेर शिक्कामोर्तब, तर ‘या’ खेळाडूंना डच्चू
- अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
- तेलाच्या जाहिरातीतून सौरव गांगुलीला काढल्यानंतर अडानी ग्रुपच स्पष्टीकरण
- भांडवली बाजारा सबंधित ७ संस्थांना ‘सेबी’ कडून दिलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
