Share

मोठी बातमी : जेडीयूच्या तिकिटावर ऐश्वर्या राय उतरणार बिहारच्या रणसंग्रामात ?

Published On: 

पटना : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गुरुवारी राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) तीन आमदारांनी जनता दल युनायटेडमध्ये (जेडीयू) प्रवेश केला. त्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांना दिलेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कारण, या तीन आमदारांमध्ये लालूप्रसाद यादव यांचे व्याही चंद्रिका राय यांच्यासह आमदार जयवर्धन यादव आणि फराज फातमी यांनी जेडीयूचे सदस्यत्व स्वीकारले.

जेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांचे व्याही चंद्रिका राय यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रिका राय यांनी आरजेडीवर जोरदार टीका केली. ‘लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांनी लोकसभा उमेदवाराच्या विरुद्ध काम केल्यानंतरही पक्षाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही’ असे सांगत चंद्रिका राय यांनी आपली मुलगी आणि तेजप्रताप यादव यांची पत्नी ऐश्वर्या राय या जदयूच्या तिकीटावर बिहारच्या महुआ मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे असे संकेत दिले आहेत.

जालना शहरातील 107 वर्षीय वृध्द महिलेने केली कोरोनावर मात

एका खासगी चॅनलशी बातचीत करताना, ‘तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव हे दोघे भाऊ कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार? याची माहिती असेल तर आम्हालाही सांगा… असे ऐकले आहे की दोघेही मतदारसंघ शोधत आहेत,’ असे म्हणत चंद्रिका राय यांनी टीका केली आहे. विशेष म्हणजे, तेजप्रताप यादव सध्या वैशाली जिल्ह्यातल्या महुआ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अशा वेळी चंद्रिका राय हे आपली मुलगी ऐश्वर्या राय यांनाच या मतदारसंघातून जदयूच्या तिकीटावर उमेदवारी मिळवून देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते.

गडाखांच्या मनगटावरील शिवबंधन जिल्ह्यातील शिवसेनेला उभारी देणार का ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!