Share

‘संजू’ मधील कमलेश कोण आहे?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : बॉक्स ऑफिसवर सध्या संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘संजू’ धुमाकूळ घालत आहे. राजकुमार हिरानीच्या या चित्रपटाने तीनच दिवसात १०० कोटींचा गल्ला जमवलाय. या चित्रपटातून संजयच्या खऱ्या आयुष्यातील अनेक गोष्टी उलगडल्या आहेत. या चित्रपटात संजयचा बेस्ट फ्रेंड कमलेश हा दाखवला आहे. विकी कौशल या अभिनेत्याने ही भूमिका साकारली आहे. पण ख-या आयुष्यात संजयचा फ्रेंड कमलेश नाही, तर परेश गिलानी आहेत.

अमेरिकेत परेश गिलानी बीपीजी मोर्टसचे सीईओ, चेअरमन असून ते एक यशस्वी बिझनेसमन आहेत. ते इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टमध्ये काम करतात . ते सध्या मून एक्सप्रेस, डिव्हीडी मोटार कॉर्पोरेशन, व्हायएम इनकॉर्पोरेशन आणि केस पॉइंटसाठी काम करत आहेत. ते त्यांच्या बिझनेस करिअरमध्ये यशस्वी आहेत. ते नुकतेच भारतात एक प्रोजेक्ट घेऊन आले आहेत. हे काम ते रतन टाटासोबत करत आहेत. त्याचबरोबर ते भारतातील खेडेगावांमधील पाण्याची समस्या सोडवणार आहेत.

परेश हे गुजराती कुटूंबातून असून त्याचा जन्म यूएसमध्ये झाला आहे. त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तिथेच झाले. तिथेच त्यांनी प्रोफेशन लाइफ सुरु केली . न्यूयॉर्कमध्ये संजय दत्त आणि त्यांची भेट झाली. संजय दत्तच्या आई नर्गिस दत्त यांच्यावर या काळात उपचार सुरु होते. परेश या काळात संजयचे फॅन म्हणून आले होते. त्यानंतर दोघांची मैत्री वाढली. चित्रपटात कमलेशला कमली हे पेटनेम देण्यात आले होते. तर रिअल लाइफमध्ये परेशला पाडिया या नावाने ते पुकारत. चित्रपटामध्ये कमलेशला रेड कलरचा जॅकेट घातलेला दाखवण्यात आले आहे . मात्र ख-या आयुष्यात संजय दत्तने त्याला एक रेड कलरचा शर्ट दिलेला होता.

अंजली दमानिया यांच्या अडचणीत वाढ, अटक वॉरंट जारी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!