अबुधाबी : आयपीएल 2021 चा अंतिम सामना शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर लढतील. सामना संध्याकाळी भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता सुरू होईल. चेन्नईचा संघ नवव्यांदा स्पर्धेत खेळेल तर केकेआर तिसऱ्यांदा विजेतेपदाचा सामना खेळेल.
CSK ने आतापर्यंत तीन ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्याचबरोबर कोलकात्याने दोन विजेतेपद पटकावले आहेत. चेन्नईने 2018 पासून आणि केकेआरने 2014 पासून एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. आता धोनी ब्रिगेडची नजर चौथ्यांदा चॅम्पियन होण्यासाठी असेल आणि नाईट रायडर्स तिसऱ्या जेतेपदाच्या शोधात असेल.
जेतेपदासाठी चेन्नई-कोलकातामध्ये चुरशीची स्पर्धा
भारतात खेळल्या गेलेल्या पहिल्या लीगनंतर यूएई लीगच्या सुरुवातीला चेन्नईने चांगली कामगिरी केली आणि प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला. पण सीएसके साखळी टप्प्याच्या अखेरीस गडगडला आणि सलग तीन सामने गमावले. तथापि, चेन्नईने पहिल्या क्वालिफायरमध्ये जोरदार पुनरागमन करत दिल्ली कॅपिटल्सला (डीसी) पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवे श केला. दुसरीकडे, पहिल्या टप्प्यातील निराशाजनक कामगिरी विसरून कोलकात्याने दुसऱ्या टप्प्यात मोठी चमक दाखवली. केकेआरने यूएईमध्ये 9 पैकी सहा सामने जिंकले आहेत. कोलकाताने एलिमिनेटरमध्ये आरसीबी आणि क्वालिफायर -2 मध्ये डीसीला हरवून अंतिम फेरी गाठली. केकेआरने सलग शेवटचे चार सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत जेतेपदासाठी केकेआर आणि चेन्नई यांच्यात चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यपालांच्या हस्ते ‘वेब नागपूर’ वेबसाईटचे लाँचिंग
- ‘महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली’, राजनाथ सिंह यांचा दावा
- ‘पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मुलीची निर्घृण हत्या होणं सामाजिक अध:पतनाचं लक्षण’
- पुण्यातील कब्बडीपटू मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी
- ‘अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार’, किरीट सोमय्यांचा दावा


