Share

पुण्यातील कब्बडीपटू मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी

Published On: 

पुणे: एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बिबवेवाडी परिसरात तीन तरुणांनी कोयत्याने वार केला. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली. बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स याठिकाणी ही घटना घडली. पीडित मुलगी नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी येथे आली होती. त्याच वेळी तिथे आलेल्या तीन नराधम तरुणांनी तिच्यावर कोयत्याने वार केला. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान १२ तासांच्या आत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स परिसरात आरोपी लबून बसला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळताना तिच्यावर कोयत्यानं वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असल्याचे अजित पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!