Share

कोण होणार राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ? ‘ही’ नावं आहेत चर्चेत

Published On: 

पुणे : नुकताच राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आपल्या पदाची मुदत संपल्याने आपण राजीनामा दिल्याचे अजिंक्यराणा पाटील यांनी सांगितले आहे. तर आपण युवक राष्ट्रवादीत काम करण्यास इच्छुक असून मला संधी द्यावी अशी इच्छा देखील अजिंक्यराणा यांनी बोलून दाखवली आहे.

आता विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झाल्याने या पदासाठी अनेक नावं चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीने पक्षात अनेक युवकांना संधी दिली आहे. त्यामुळे विध्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे महत्व त्या अर्थाने अधिक वाढले आहे. यामध्ये विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस आकाश झांबरे यांचे नाव चर्चेत आहे. मी एका सामान्य कुटुंबातून आलेलो आहे. जर मला संधी मिळाली तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी लढेल. अशी भूमिका आकाश झांबरे यांनी मांडली आहे. आकश झांबरे हे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस आहेत आणि त्याचं नावं आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे.

त्याचबरोबर विध्यार्थी संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष मयुर पटारे याचं देखील नावं प्रदेशाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये समोर येत आहे. मयुर पटारे हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. पक्ष देईल ती जबादारी स्वीकारेल. पक्षात काम करताना वेळोवेळी मला आमदार रोहित पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे ते यापुढे देखील घेईल. जर मला संधी मिळाली तर विद्यार्थ्यांचे प्रश्न आक्रमकतेने मांडेल. असं पटारे यांनी सांगितल आहे.

विद्यमान विद्यार्थी प्रदेश संघटक दयानंद शिंदे हे देखील या पदाच्या शर्यतीत आहेत. मात्र प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. असं शिंदे म्हणाले आहेत. तर रोहित पावर सारख्या युवा नेत्यांच्या विचारसरणीचा विद्यार्थी संघटनेत काम करताना नक्कीच फायदा होतो. अस देखील शिंदे म्हणाले आहेत.

सोमनाथ लोहार याचं नावं सुद्धा समोर येत आहे. पण मी कधी माझी इच्छा व्यक्त केली नाही आणि जर काम बघून पक्षाने जरी मला संधी दिली तर माझे मार्गदर्शक अभिषेक बोके यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. असं लोहार यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर प्रदेश सरचिटणीस आकाश अनबोले नांदेड जिल्हा अध्यक्ष कन्हैय्या कदम, सनी मानकर यांचे नावं देखील चर्चेत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शरद पवार यांनी युवकांना संधी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार रोहित पवार यांची सुद्धा ‘ग्रँड लाँचिंग’ करण्यात आली. तर अनेक युवा आमदारांची फौज त्यांनी उभा केली आहे. त्यामुळे आशात विध्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे महत्व कमालीचे वाढले आहे.

आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेतृत्व म्हणून जोमाने पुढे येत असणारे रोहित पवार आपले वजन यापैकी कोणत्या कार्यकर्त्याच्या पारड्यात टाकतात यावर सुद्धा अनेक गणितं अवलंबून असणारं आहेत. त्यामुळे फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचीच नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड सुद्धा कमालीच्या चुरशीची ठरणार अशी चिन्ह दिसत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!