Share

उद्धव ठाकरेंना त्यांच्याच भाषेत ‘रोकठोक’ उत्तर देणारे रोहित पवार कोण आहेत?

Published On: 

बारामती : ‘सामना’च्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ‘आमच्या उद्धवला सांभाळा, असं बाळासाहेब ठाकरे अखेरच्या क्षणी का म्हणाले होते याचा अर्थ आता समजला. संपादकीय लिहिण्याऐवजी दोन ओळीचा राजीनामा लिहिला असता वडिलांप्रमाणे आपल्याला ताठ कणा आहे हे महाराष्ट्राला पाहायला मिळालं असतं,’असं रोहित पवार म्हणाले. उद्धव ठाकरेंना रोखठोक आणि त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्याने रोहित पवार चर्चेत आले आहेत. ठाकरेंना रोहितनंआपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय.

रोहित पवार कोण आहेत?

गेली पाच दशकांपासून महाराष्ट्र तसेच देशाच्या राजकारणात अग्रभागी असणारे नाव म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार. बारामतीचे आमदार ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते थेट केंद्रातील कृषीमंत्रीपद शरद पवार यांनी सक्षमपणे सांभाळले आहे. पवार यांची तिसरी पिढी आता चांगलीच ऍक्टिव्ह झाल्याच पाहायला मिळत आहे. राजकारणासह कृषीक्षेत्र आणि व्यवसाय क्षेत्रावर असणारे पवार यांचे प्रेम सर्वश्रुत आहे. पवार यांचा हाच वारसा आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील रोहित पवार हे सक्षमपणे सांभाळत आहेत.

रोहित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नातू आहेत. पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांचा रोहित हा मुलगा आहे, म्हणजेच अजित पवारांचे नात्याने पुतण्या आहेत . रोहित सध्या बारामती जिल्हा परिषदेत सदस्य आहेत . शरद पवार याचे राजकारण आणि कै.आप्पासाहेब पवार यांचा कृषीक्षेत्रातील वारसा रोहित हे यशस्वीपणे सांभाळत आहेत. पुणे जिल्हापरिषदेचे सदस्य असणारे रोहित पवार हे समाजकारणातही अग्रेसर आहेत. तसेच बारामती अॅग्रोच्या माध्यमातून कृषी व्यवसायात असणारे त्यांचे काम देखील कौतुकास्पद आहे.

पवार या नावाचं वलय असताना देखील ते युवकांशी संवाद साधत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांच्याप्रमाणे शेतीसोबतच उद्योगजकांवर असणारे रोहित पवार यांचे प्रेम दिसून येते. त्यामुळेच युवकांमधील उद्योजक घडवण्यासाठी ‘सृजन’च्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. एकंदरीतच पवार घराण्याचे राजकारण आणि व्यवसाय याचा वारसा रोहित पवार हे सक्षमपणे पुढे घेऊन जातांना दिसत आहेत.

पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार

https://marathi.maharashtradesha.com/sharad-pawar-not-positive-to-give-ticket-to-parth-pawar/

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!