Share

दिग्गजांना मागे टाकत विधान परिषदेची उमेदवारी मिळवणारे प्रवीण दटके आहेत तरी कोण ?

Published On: 

मुंबई : भाजपने वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी भाजपकडून प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला माढा हा आपला बालेकिल्ला गमवावा लागला होता.

जितेंद्र आव्हाड ठाण्यातील रुग्णालयात दाखल

नागपूरचे प्रवीण दटके हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. नागपूरचे माजी महापौर आणि विद्यमान शहराध्यक्ष अशी त्यांची ओळख आहे. संघाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या महाल भागातून अनेक टर्म नगरसेवक आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रवीण दटकेंची नाराजी समोर आली होती. प्रवीण दटके यांना मध्य नागपूरमधून भाजपची उमेदवारी हवी होती. पण तिथून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज झाले होते.त्यांचे वडीलही संघाचे तसेच जनसंघाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांना उमेदवारी देऊन एका निष्ठावान कार्यकर्त्याचा सन्मान करण्यात आला आहे. गडकरी आणि फडणवीस अशा दोन्ही नेत्यांच्या जवळ राहण्याचे सूत्र त्यांनी सांभाळले आहे.

आयपीएलमध्ये मराठमोळ्या ४८ वर्षांच्या खेळाडूचा लिलाव

दरम्यान, संख्याबळानुसार महाविकास आघाडीला पाच तर भाजपला चार जागा मिळणार असल्याने विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी होणारी निवडणूक बिनविरोधच पार पडेल. भाजपने तर तसे संकेत आधीच दिले आहेत. नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या २९ मतांची आवश्यकता असेल. महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावावर १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते.

प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड होताच चंद्रकांत पाटलांनी केला ‘हा’ निश्चय

भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोटय़ा पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे ११२ मते आहेत.विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपला चौथी जागा निवडून आणण्याकरिता चार मते कमी पडत असली तरी गुप्त मतदान असल्याने ही मते मिळण्यात काहीच अडचण येणार नाही, असे भाजपचे नेते ठामपणे दावा करतात.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!