Share

आयपीएलमध्ये मराठमोळ्या ४८ वर्षांच्या खेळाडूचा लिलाव

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईचा ज्येष्ठ फिरकीपटू प्रवीण तांबे आयपीएलच्या तेराव्या हंगामातला सर्वात ज्येष्ठ खेळाडू ठरला आहे. ४८ वर्षीय प्रवीण तांबेवर कोलकाता नाईट रायडर्सने २० लाखांची बोली लावली आहे. प्रवीने २०१३ रोजी आयपीएलमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकलं. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना प्रवीणने गोलंदाजीत आपलं कौशल्य दाखवून दिलं होतं.

४१व्या वर्षी प्रविण तांबेने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. राहुल द्रविडच्या नेतृत्वात प्रविण तांबे राजस्थानकडून खेळला होता. २०१३ साली तांबेने राजस्थानकडून ३ मॅच खेळल्या. २०१३-१४ सालच्या चॅम्पियन्स लीगमध्ये तांबेने ५ मॅचमध्ये १२ विकेट घेतल्या. त्या मोसमातला तांबे हा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू होता.

आयपीएल २०१४ मध्ये तांबेने १३ मॅचमध्ये १५ विकेट पटकावल्या. २०१४ सालीच तांबेने कोलकात्याविरुद्ध हॅट्रिकही घेतली होती.२०१५ साली प्रविण तांबेने राजस्थानकडून १० मॅच खेळल्या आणि ७ विकेट घेतल्या. यानंतर राजस्थानचं २ वर्षांसाठी निलंबन झालं.

पुढे गुजरातने तांबेला विकत घेतलं. गुजरातकडून खेळताना सुरेश रैनाच्या नेतृत्वात तांबेने ७ मॅचमध्ये ५ विकेट घेतल्या. यानंतर तांबे हैदराबादच्या टीममध्ये गेला, पण हैदरबादने त्याला खेळवलं नाही.आयपीएलमध्ये खेळणारा सगळ्यात वयस्कर खेळाडू असण्याचा विक्रमही प्रविण तांबेच्या नावावर आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1207933394291609602?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1207932714025832448?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!