Share

‘सिर्फ़ बातों की है मोदी सरकार, कुचल रही ग़रीबों के अधिकार’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर तोफ दागली आहे. राहुल गांधी मोदीं सरकारवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मनरेगा संदर्भात एक ट्विट करून भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

त्यात त्यांनी मनरेगा मजुरांना पैसे काढण्यासाठी होत असलेल्या त्रासावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. मनरेगावर काम करणाऱ्या मजुरांना मजुरीचे पैसे काढण्यासाठी होत समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. या वृत्ताचा हवाला देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर धोरणांवरून टीका केली आहे.

आधी लॉकडाउन लागू केला, कोट्यवधी मजुरांना रस्त्यावर आणलं. नंतर त्यांचा एकमेव आधार असलेल्या मनरेगाची कमाई बँकांमधून काढणंही अवघड करून ठेवले. मोदी सरकार फक्त बोलण्यापुरतच असून, गरीबांचे अधिकारांची पायदळी तुडवत आहे,’ असे म्हणत राहुल गांधींनी भाजप सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!